12 December 2024 1:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे Maruti Suzuki Swift | या कारच्या खरेदीसाठी शो-रूम मध्ये गर्दी, 6.49 लाखांची बजेटमधील कार खरेदी करा, फीचर्स जाणून घ्या BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL Horoscope Today | नवीन वर्ष 'या' राशींसाठी असणार अत्यंत खास; शनीच्या साडेसातीपासून व्हाल कायमचे मुक्त
x

Bollywood Celebrities Instagram Sponsored Post Charges | बॉलीवूड सेलिब्रिटींचे इंस्टाग्राम पोस्ट चार्जेस | इतके पैसे घेतात

Bollywood Celebrities Instagram Sponsored Post Charges

मुंबई, ०३ ऑक्टोबर | सोशल मीडिया मार्केटिंगचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यामध्ये आता बॉलिवुड सेलिब्रिटीही सामील झाले आहेत. त्यातले काही बॉलिवुड सेलिब्रिटीज ५० लाख रुपये इतकेही मानधन (Bollywood Celebrities Instagram Sponsored Post Charges) घेतात. ब्रँड ॲम्बेसिडर ते ब्रँड इन्फ्ल्यूंसर्स हे इंस्टाग्राम पासून किती मानधन मिळवतात हे आपण पाहू;

Bollywood Celebrities Instagram Sponsored Post Charges. Indian celebrities & influencers, on the other hand, make peanuts through Instagram. with celebrities, who have a following of millions, the charges are considerably higher. Here are a few Bollywood celebrities who charge a ton of money for the sponsored or advertised content that they post :

१. प्रियांका चोप्रा:
देसी गर्ल म्हणून ओळखली जाणारी प्रियंका चोप्रा आता ग्लोबल स्टार बनली आहे. इंस्टाग्राम वर प्रियंकाचे ६ करोड पेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. तिच्या एका सोशल मीडिया पोस्टचे चार्जेस १.८० कोटी रुपये इतके आहेत. फॉर्बेसने जारी केलेल्या यादीमध्ये प्रियंका ही सगळ्यात श्रीमंत इंस्टाग्रामर आहे.

२. आलिया भट:
आलियाचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. इंस्टाग्रामवर तिचे फॉलोवर्स पाच करोड पेक्षा जास्त आहेत. एका स्पॉन्सर पोस्टसाठी आलीया एक करोड रुपये मानधन घेते.

३. शाहरुख खान:
बॉलिवूडचा किंग खान वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करून आहे. शाहरुख खानचे फॉलोवर्स इंस्टाग्रामवर २६ मिलियन पेक्षा जास्त आहेत आणि एका ब्रांडेड पोस्ट साठी शाहरुख खान ८० लाख ते १ करोड रुपये पर्यंतचे मानधन घेतो.

४: अमिताभ बच्चन: ५० लाख रुपये
बिग बी सोशल मीडियाच्या जगतावरही राज्य करतात. २८ मिलियन म्हणजेच दोन करोड पेक्षा जास्त फॉलोवर्स असलेले बिग बी, प्रत्येक पोस्टसाठी पन्नास लाख रुपये इतके मानधन घेतात.

५: विराट कोहली: १.३५ कोटी
सोशल मीडियावर सगळ्यात जास्त फॉलोवर्स असणाऱ्या स्पोर्ट्समेन पैकी विराट कोहली हा एक आहे. त्याची इंस्टाग्रामवर खूप चांगली कम्युनिटी आहे. १५७ मिलियन एवढ्या प्रमाणात फॉलोवर्स असलेल्या विराटला सोशल मीडियावरील प्रत्येक पोस्टसाठी १.३५ कोटी रुपये दिले जातात.

६: शाहिद कपूर: ३० ते ५० लाख
शाहिद खूप चांगला अभिनेता तसेच डान्सर आहे. त्याचे इंस्टाग्रामवर तीन करोड पेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. सोशल मीडियावरील प्रत्येक जाहिरातीसाठी बॉलिवूडचा कबीर सिंग ३० ते ५० लाख रुपये घेतो.

७: दीपिका पादुकोण: १.५ कोटी
दिपीकाचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहतावर्ग आहे. दीपीका ही बॉलीवूडमध्ये सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्यांपैकी एक अभिनेत्री आहे. ६० मिलियन म्हणजेच ६ करोड पेक्षा जास्त फॉलॉवर असलेली दीपिका एका पोस्टसाठी १.५ कोटी रुपये घेते.

८: अक्षय कुमार: १०,२४२,१२१.६६ रुपये
बॉलीवुड बरोबरच सोशल मीडियामध्ये अक्षय कुमार खिलाडी आहे. अक्षयचे इंस्टाग्रामवर ५४ मिलियन फॉलोवर्स आहेत. अक्षयचे इंस्टाग्राम वरील उत्पन्न १०,२४२,१२१.६६ इतके आहे.

९: रणवीर सिंग: ८१ लाख रुपये
इंस्टाग्रामवर रणवीरचे उत्पन्न ८१ लाख रुपयांच्या आसपास आहे.

१०: सलमान खान: ८५ लाख रुपये
बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचे इंस्टाग्रामवर ४४ मिलियन फॉलोवर्स आहेत. आणि त्याचे अंदाजे उत्पन्न ८५ लाख ३५ हजार ३४२ एवढे आहे.

११: कॅटरिना कैफ: ९७ लाख
कॅटरीनाने बॉलिवूडमध्ये स्वतःची जागा निर्माण केली आहे. Kaybaykatrina नावाचा तीचा स्वतःचा ब्युटी ब्रँड पण आहे. ५४ मिलियन पेक्षा जास्त चाहतावर्ग असलेल्या कॅटरिनाचे इंस्टाग्राम वरील उत्पन्न हे ९७ लाख ४० हजार १८६ इतके आहे.

१२: फरहान अख्तर: ७ लाख रुपये
फरान अख्तर अभिनय दिग्दर्शन आणि चित्रपट निर्मिती सुद्धा करतो. त्याची स्वतःची एक्सेल एंटरटेनमेंट नावाची निर्मिती संस्था आहे. ३० लाख पेक्षा जास्त फॉलोवर्स असलेला फरहान अख्तर इंस्टाग्राममधून ७ लाख ७८ हजार ११९ रुपये कमावतो.

१३: अनुष्का शर्मा: ९५,१०,८६३
अनुष्का शर्माने आत्तापर्यंत अनेक चांगल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. निर्मितीबरोबरच सोशल मीडियावरही अनुष्काची चलती आहे. ५२ मिलियन पेक्षा जास्त फॉलॉवर असलेल्या अनुष्काचे उत्पन्न इंस्टाग्रामवर ९५ लाख १० हजार ८६३ इतके आहे.

१४: श्रद्धा कपूर: १ कोटी १८ लाख रुपये
श्रद्धा कपूरचे नृत्य, अभिनय आणि सौंदर्य प्रेक्षकांना मोहित करून टाकतात. ६६ मिलीयन फॉलॉवर अलेल्या श्रद्धा कपूरचे उत्पन्न हे १ कोटी १८ लाख ९१ हजार ५१३ इतके आहे.

१५: करीना कपूर: १-२ कोटी
बॉलिवूडची बेबो करीना कपूर इंस्टाग्रामवर चांगलीच ॲक्टिव आहे. इंस्टाग्रामवर तिचा ७० लाखापेक्षा जास्त चाहतावर्ग आहे. प्रत्येक पेड पोस्टसाठी करीना १ ते २ कोटी रुपये घेते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Bollywood Celebrities Instagram Sponsored Post Charges information.

हॅशटॅग्स

#Instagram(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x