5 June 2023 9:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Viral Video | तो फ्लॅटफॉर्मवर तरुणीच्या मागे सावकाश चालत होता, मेट्रो ट्रेन जवळ येताच तिला उचलून रुळावर उडी मारली आणि.... Spider-Man | स्पायडरमॅन चित्रपटाने अवघ्या 4 दिवसात 1700 कोटींचा टप्पा ओलांडला, भारतीय बॉक्स ऑफिसवर एक विक्रम Horoscope Today | आजचे राशिभविष्य | 06 जून 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Kore Digital IPO | कोर डिजिटल IPO किती सबस्क्राईब झाला? शेअरची ग्रे मार्केट प्राईस पहिल्याच दिवशी मोठा परतावा देणार? Brightcom Group Share Price | ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या स्वस्त शेअर्समध्ये बंपर तेजी, एका महिन्यात 65 टक्के परतावा दिला Adani Group Shares | अदानी समुहाच्या शेअरमध्ये आदळ आपट सुरू, काही शेअर्स हिरव्या निशाणीवर तर काही शेअर्स लाल Numerology Horoscope | 06 जून 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल
x

फिल्मी लक्ष्मीबाईंवर जावेद अख्तर यांच्याकडून मानहानीचा खटला | मुंबई पोलीसांचंही समन्स

Bollywood Javed Akhtar, sues defamation, actress Kangana Ranaut

मुंबई, ३ ऑक्टोबर : बॉलीवूड कलाकार कंगना रणौतच्या विरोधात काही दिवसांपूर्वी बॉलीवूड मधील प्रोडक्शन हाऊसेसने खटले दाखल केले आहेत. त्यानंतर तिच्या अडचणी अजून वाढताना दिसत आहेत. तत्पूर्वी म्हणजे मागील महिन्यात तिच्या विरोधात तुमकूर कर्नाटकमध्ये एक आणि मुंबईत दोन केसेस दाखल झाल्या आधीच आहेत.

त्यानंतर बॉलीवूड मधील सुप्रसिद्ध गीतकार-लेखक जावेद अख्तर यांनी देखील कंगनाच्या विरोधात मानहानीचा खटला न्यायालयात दाखल केला आहे. एका वृतानुसार, जावेद अख्तर यांनी कंगनाच्या एका वक्तव्यावरून सदर खटला दाखल केला आहे. कंगनाने समाज माध्यमांच्या मार्फत दावा केला होता की, अख्तर यांनी तिला घरी बोलवून धमकावत अभिनेता हृतिक रोशनची माफी मागण्यास सांगितले होते.

दुसरीकडे अभिनेत्री रानौत कंगना आणि तिची बहीण रंगोली चंदेल यांना मुंबई पोलिसांनी समन्स बजावल्याने तिची डोकेदुखी वाढली आहे. कंगना आणि तिची बहीण रंगोली यांना १० नोव्हेंबर रोजी हजर राहण्यास सांगितलं आहे. ANI’ने यासंदर्भातलं अधिकृत वृत्त दिलं आहे. कंगना आणि तिची बहीण रंगोली यांनी केलेल्या समाज माध्यमांवर पोस्टच्या माध्यमातून समाजात दुहीचं वातावरण निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला असं थेट आरोप या दोघींवर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी या दोघींनाही उत्तर द्यायचं आहे. त्यासाठीच हे समन्स बजावण्यात आलं आहे.

 

News English Summary: Well known Bollywood lyricist-writer Javed Akhtar has also filed a defamation suit against Kangana. According to a source, Javed Akhtar has filed the case based on a statement made by Kangana. Kangana had claimed on social media that Akhtar had called her home and threatened her to apologize to actor Hrithik Roshan.

News English Title: Bollywood Javed Akhtar sues defamation against actress Kangana Ranaut News updates.

हॅशटॅग्स

Bollywood(88)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x