5 June 2023 11:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Viral Video | तो फ्लॅटफॉर्मवर तरुणीच्या मागे सावकाश चालत होता, मेट्रो ट्रेन जवळ येताच तिला उचलून रुळावर उडी मारली आणि.... Spider-Man | स्पायडरमॅन चित्रपटाने अवघ्या 4 दिवसात 1700 कोटींचा टप्पा ओलांडला, भारतीय बॉक्स ऑफिसवर एक विक्रम Horoscope Today | आजचे राशिभविष्य | 06 जून 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Kore Digital IPO | कोर डिजिटल IPO किती सबस्क्राईब झाला? शेअरची ग्रे मार्केट प्राईस पहिल्याच दिवशी मोठा परतावा देणार? Brightcom Group Share Price | ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या स्वस्त शेअर्समध्ये बंपर तेजी, एका महिन्यात 65 टक्के परतावा दिला Adani Group Shares | अदानी समुहाच्या शेअरमध्ये आदळ आपट सुरू, काही शेअर्स हिरव्या निशाणीवर तर काही शेअर्स लाल Numerology Horoscope | 06 जून 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल
x

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर फडणवीस सरकार साखर सम्राटांवर मेहेरबान: सविस्तर

Devendra Fadanvis, Congress, Shivsena, BJP, NCP

मुंबई: राज्यातील आर्थिकदृष्ट्या संकटात सापडलेल्या राज्यातील एकूण १५ सहकारी साखर कारखान्यांना राजगोपाल देवरा समितीच्या शिफारशींचा विचार करून मदत करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हा निर्णय राजकीय हेतूने घेतल्याचा आरोप अनेक विरोधकांनी केला आहे.

राज्यातील गेल्या ५-६ वर्षातील दुष्काळ परिस्थिती आणि शेतकरी सभासदांच्या हिताचा विचार करून आजचा निर्णय घेण्यात आला आहे. या कारखान्यांमध्ये सांगली जिल्ह्यातील रा. बा. पाटील सहकारी साखर कारखाना, पुणे जिल्ह्यातील भीमा-पाटस सहकारी साखर कारखाना, अहमदनगर जिल्ह्यातील डॉ. बा. बा. तनपुरे सहकारी साखर कारखाना, नाशिक जिल्ह्यातील के. के. वाघ सहकारी साखर कारखाना व कळवणचा वसंतदादा सहकारी साखर कारखाना आदींचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील संत एकनाथ सहकारी साखर कारखाना, पैठणचा शरद सहकारी साखर कारखाना, सिल्लोडचा सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना, बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई सहकारी साखर कारखाना आणि वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, यवतमाळ जिल्ह्यातील वसंत सहकारी साखर कारखाना, जालना जिल्ह्यातील रामेश्वर सहकारी साखर कारखाना, सोलापूर जिल्ह्यातील संत कुर्मदास सहकारी साखर कारखाना, हिंगोली जिल्ह्यातील बारशिव हनुमान सहकारी साखर कारखाना तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना यांचा समावेश आहे.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x