12 December 2024 5:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Salman Khan | भर पबमध्ये भाईजानने रणबीर कपूरच्या लगावलेली कानशीलात; नंतर मागितली होती माफी - Maharashtranama Marathi

Salman Khan

Salman Khan | तुम्ही आतापर्यंत अभिनेता सलमान खान याचे अनेक मॅटर ऐकले असतील. अशातच इंडस्ट्रीमध्ये कायम असं ऐकायला मिळतं की, भाईजान (Salman Khan) एकदा पंगा घेतला तर अगदी शेवटपर्यंत दुश्मनी निभवतात. विवेक ओबेरॉय आणि सलमानच्या वाद विवादांबद्दल तुम्ही अनेकवेळा ऐकलं असेल. परंतु दिवंगत अभिनेता ऋषी कपूर यांचा मुलगा रणबिर कपूर (Ranbir Kapoor) याच्याबरोबर देखील सलमान खानने पंगा घेतला होता. अक्षरशः भर पबमध्ये रणबीरच्या कानशीलात लगावली होती.

रुपेरी पडद्यावर येण्याआधी रणबीरची सलमानबरोबर भेट झाली होती. त्या दोघांची ही भेट एका पबमध्ये झाली होती. रणबिर कपूर आपल्या मित्रांबरोबर पार्टी एन्जॉय करण्यासाठी आला होता. याच पार्टीमध्ये अभिनेता संजय दत्त यांच्यासोबत सलमान खान देखील आले होते.

माध्यमांच्या माहितीनुसार सलमान आणि रणबीर एकमेकांबरोबर संवाद साधत होते. संवाद साधतानाच दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली. त्याचवेळी सलमान यांना राग अनावर होऊन रणबीरवर हात उचलला गेला. रणबिरला अनेक लोकांसमोर अपमान सहन करावा लागल्यामुळे तो थेट पार्टी सोडून निघून गेला.

दरम्यान याप्रकरणी सलमानच्या वडिलांनी त्यावेळी ऋषी कपूर यांची माफी देखील मागितली होती. त्यामुळे या प्रकरणाला जास्त आग लागली नाही. परंतु ज्यावेळी कटरीना कैफची एन्ट्री बॉलीवूडमध्ये झाली तेव्हा पुन्हा दोघांमध्ये वाद सुरू होताना पाहायला मिळाला.

सलमान कायम कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असताना दिसतो. सध्या सलमानच्या फिल्मी जीवनाबद्दल सांगायचं झालं तर, लवकरच सलमान आपल्याला बिग बॉस 18 होस्ट करताना दिसणार आहे. भाईजान त्याच्या फिल्मी अंदाजामधून प्रेक्षकांचे मनोरंजन करायला पुन्हा एकदा सज्ज झाला आहे.

News Title : Bollywood when Salman Khan Slapped Ranbir Kapoor check details 06 September 2024.

हॅशटॅग्स

#Salman Khan(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x