12 October 2024 2:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Login | पगारदारांनो, तुम्ही गरजेच्या वेळी EPF मधून पैसे काढता, नवा नियम लक्षात घ्या, होतं खूप मोठं नुकसान - Marathi News Post Office Scheme | महिलांनो पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवा आणि 32,000 रुपयांपर्यंत व्याज मिळवा, जाणून घ्या योजनेविषयी Post Office Interest Rate | पोस्ट ऑफीसची खास योजना, बचतीवर व्याजानेच कमवाल 2 लाख रुपये, फायदाच फायदा - Marathi News Credit Card | क्रेडिट कार्ड घेण्याआधी स्वतःला विचारा हे प्रश्न, नुकसान होणार नाही आणि मिळतील अनेक फायदे - Marathi News EPFO Passbook | पगारातून EPF चे पैसे कापले जातात, असा घ्या फायदा, EPF खात्यात जमा होतील 3 ते 5 करोड - Marathi News Shukra Rashi Parivartan | शुक्र राशी परिवर्तन, या 6 राशींच्या लोकांचा गोल्डन टाईम सुरु होतोय, तुमची राशी कोणती - Marathi News Gold Rate Today | बापरे, दसऱ्याच्या एक दिवस आधी सोन्याचे भाव वाढले, तुमच्या शहरातील आजचे नवे दर जाणून घ्या - Marathi News
x

Raid 2 Movie | अजय देवगन पुन्हा एकदा करणार भ्रष्टाचाऱ्यांचा पर्दाफाश; Raid 2 सिनेमा बॉक्स ऑफिसवर झळकणार

Highlights:

  • रेड 2 हा रेड या चित्रपटाचा सिक्वल
  • हा मराठमोळा अभिनेता दिसणार विलनच्या भूमिकेत :
  • रितेश देशमुख विलनच्या भूमिकेत
  • या तारखेला हा चित्रपट रिलीज होणार
Raid 2 Movie

Raid 2 Movie | हिंदी सिनेसृष्टीतील धडाकेबाज अभिनेता अजय देवगन त्याच्या रोमँटिक, ॲक्शनबाज आणि थरारक सिनेमांमुळे कायम चर्चिला जातो. सोशल मीडियावर अजयची जबरदस्त फॅन फॉलोविंग पाहायला मिळते. 8 मार्च 2024 मध्ये रिलीज झालेला ‘शैतान’ या चित्रपटामध्ये अजय झळकला. त्याचा हा हॉरर सिनेमा त्याच्या चाहत्यांना चांगलाच भावला. दरम्यान अजय आता आपल्याला एका नव्या सिनेमामध्ये पाहायला मिळणार आहे. ‘रेड 2’ या चित्रपटामध्ये अजय भ्रष्टाचारांचा पर्दाफाश करण्यासाठी सज्ज झाला आहे.

रेड 2 हा रेड या चित्रपटाचा सिक्वल
2018 साली अजय चा ‘रेड ‘ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. त्याच्या इतर चित्रपटांपेक्षा रेड या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं होतं. अजयची डायलॉगबाजी आणि ॲक्शनमुळे प्रेक्षक भारावून गेले होते. रेड 2 हा रेड या चित्रपटाचा सिक्वल असणार आहे.

हा मराठमोळा अभिनेता दिसणार विलनच्या भूमिकेत :
ट्रेलर पाहून समजतंय की, हा चित्रपट पूर्णपणे इन्कम टॅक्सवर आधारित असणार आहे आणि अजय देशातल्या सर्व भ्रष्टाचारांच्या मुस्क्या आवळणार असल्याचं दिसतय. दरम्यान या चित्रपटाची घोषणा केली असून पोस्टरवरती ‘अमेय पटनायक इज बॅक’ असं लिहिलं आहे. म्हणजेच अजय देवगन हा अमेय पटनायकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

रितेश देशमुख विलनच्या भूमिकेत
या चित्रपटामध्ये मराठमोळा अभिनेता आणि आपल्या सर्वांचा लाडका रितेश देशमुख विलनच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. रितेशने आतापर्यंत सिनेसृष्टीला विनोदी आणि रोमँटिक सिनेमे दिले आहेत. रितेश सध्या बिग बॉस मराठी हा शो होस्ट करताना पाहायला मिळतोय. रेड या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार गुप्ता यांनी केले असून, बुधवारी रेड 2 ची घोषणा करण्यात आलीये.

या तारखेला हा चित्रपट रिलीज होणार
या चित्रपटाच्या महत्त्वाच्या कथानकाचे चित्रीकरण दिल्ली आणि लखनऊ येथे होणार असून 2025 मध्ये ’21 फेब्रुवारी’ या तारखेला हा चित्रपट रिलीज होणार आहे. रिलीज डेट समोर येताच प्रेक्षकांच्या मनात चित्रपट पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. अशातच पाच महिन्यानंतर अजयचा डॅशिंग चित्रपट सर्वांना पाहायला मिळणार आहे.

Latest Marathi News | Raid 2 Movie Release on box office 12 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Raid 2 Movie(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x