13 December 2024 2:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Post Office Scheme | खास FD योनजेवर फक्त व्याजातून रु. 2,62,705 कमाई सह मॅच्युरिटीला 7,62,705 रुपये मिळतील

Highlights:

  • FD करून चांगला नफा मिळवू शकता
  • पोस्टाच्या एफडीचे व्याजदर :
  • व्याजदराने किती कमवाल?
  • मॅच्युरिटीवेळी 7,62,705 रुपये मिळतील
Post Office Scheme

Post Office Scheme | प्रत्येक व्यक्ती आपल्या भविष्यासाठी पैसे गुंतवण्याचे मार्ग शोधत असतो. दरम्यान म्युचल फंड, एफडी, त्याचबरोबर सरकारच्या पेन्शन योजना आणि पोस्ट ऑफिस योजना या सर्व योजनेअंतर्ग अनेक व्यक्ती आपले पैसे गुंतवून चांगला रिटर्न मिळवत आहेत. तुम्हाला सुद्धा लखपती बनायचं असेल आणि फक्त तीन वर्षांच्या गुंतवणुकीवर लाखो रुपये व्याजदरानेच कमवायचे असतील तर, केवढी रक्कम जमा करावी लागेल? या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

FD करून चांगला नफा मिळवू शकता
पैसे गुंतवण्यासाठी पोस्ट ऑफिसच्या योजना कायमच पाहिल्या जातात. अशातच पोस्टाच्या योजनेमध्ये तुम्ही एक ते पाच वर्षांसाठी पैसे डिपॉझिट करून चांगला नफा मिळवू शकता. त्याला आपण FD असं देखील म्हणू शकतो. पोस्टाच्या एफडी योजनेमध्ये तुम्ही शंभर रुपयांपासून ते कितीही रुपयांपर्यंत रक्कम ठेवू शकता.

पोस्टाच्या एफडीचे व्याजदर :
एका वर्षाच्या एफडीसाठी पोस्ट ऑफिस तुम्हाला 6.9% ने व्याजदर देते तर, दोन वर्षांसाठी 7% आणि तीन वर्षांसाठी 7.1%. त्याचबरोबर पाच वर्षांसाठी 7.5% ने व्याजदर तुम्हाला मिळते.

व्याजदराने किती कमवाल?
समजा तुम्ही पोस्टाच्या एफडी योजनेमध्ये तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी पाच लाख रुपयांची गुंतवणूक म्हणजेच पाच लाख डिपॉझिट केले तर, मॅच्युरिटीवेळी तुम्हाला 6,17,538 रक्कम मिळेल. यामधील 1,17,538 एवढी रक्कम व्याजाचीच होईल. विशेष म्हणजे तुम्ही तुमच्या या एफडीचा कालावधी आणखीन वाढवू शकता.

मॅच्युरिटीवेळी 7,62,705 रुपये मिळतील
जर तुम्ही आणखीन तीन वर्षांसाठी एफडी वाढवली तर, मॅच्युरिटीवेळी तुम्हाला 7,62,705 रुपये मिळतील. ज्यामधील 2,62,705 एवढं व्याजदर मिळेल. त्यामुळे तुम्ही पोस्ट ऑफिस एफडी योजनेमध्ये तुमच्या हिशोबाने ठराविक रक्कम जमा करून योग्यवेळी व्याजदराची चांगली रक्कम कमावू शकता.

Latest Marathi News | Post Office Scheme FD 12 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Post office Scheme(198)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x