23 September 2021 1:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Municipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा
x

यापुढे शिवसेनेने आमच्याशी पंगा घेतला तर आम्ही जशास तसे उत्तर देणार - चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule

अमरावती, २६ ऑगस्ट | देवेंद्र फडणवीस सरकारने 31 जुलै 2019 ला वटहुकूम काडून ओबीसींचे 27 टक्के आरक्षण वाचवले. त्यानंतर राज्यात जिल्हा परिषद निवडणुकाही त्या वटहुकूमामुळेच ओबीसींना मिळालेल्या आरक्षणानुसारच झाल्यात. दुर्दैवाने आमचे सरकार जाऊन नवीन सरकार आले आणि तो वटहुकूम रद्द झाला. राज्यातील महाविकास आघाडी सरकार न्यायालयात इच्छाशक्ती अभावी ओबीसी आरक्षण वाचवू शकले नाही. मुळातच त्यांना ओबीसी आरक्षण टिकवायचे नसून या आरक्षणाविनाच त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवायच्या आहेत, असा आरोप भाजपचे प्रदेश महासचिव चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. आता 85 टक्के स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढच्या वर्षी होत आहेत. त्यामुळे डिसेंबरपर्यंत ओबीसी आरक्षण लागू झाले नाही तर राज्यातील मंत्र्यांना महाराष्ट्राची जनता गावबंदी करेल, असा इशाराही चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावतीत दिला.

BhagyaVivah Marathi Matrimonial

यापुढे शिवसेनेने आमच्याशी पंगा घेतला तर आम्ही जशास तसे उत्तर देणार – BJP leader Chandrashekhar Bawankule ultimatum to MahaVikas Aghadi on OBC reservation :

तरुणांना समस्कृतीक मंच देण्यासह देशाची संस्कृती कळावी, तसेच भारत महासत्ता होण्यासाठी युवकांना सक्षम करण्यासाठी भाजपच्या युवा वॉरियर नोंदणीसाठी भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील अमरावतीत आले होते. भाजप कार्यल्यावर शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध नोंदवीत दोन्ही नेते दुचाकी रॅलीत सहभागी होऊन पोलीस आयुक्तालयातही गेले. भाजप कार्यल्यावर हल्ला करणाऱ्यांना त्वरित अटक व्हावी अशी मागणीही या नेत्यांनी केली. युवा वॉरीयर उपक्रमासह विविध राजकीय विषयांसंदर्भात त्यांनी पत्रकरांशी संवादही साधला.

शिवसेनेचा इतिहास तपासा, हे अनेकांना खालच्या भाषेत बोलले आहेत. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना उद्धव ठाकरे यांनी जोडे मारण्याची भाषा वापरली होती. देवेंद्र फडणवीसांसंदर्भातही खालच्या दर्जाचे शब्दप्रयोग केले होते. मात्र, आम्ही त्यांच्याविरोधात कुठलेही कृत्य केले नाही. नारायण राणे यांना चक्क जेवणाच्या ताटावरून पोलिसांनी उचलले ही गंभीर बाब होती. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना शांत राहण्याचे आवाहन करणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी तसे काही केले नाही. शिवसैनिकांनी आमचे कार्यालय जाळण्याचा प्रयत्न केला आहे. यापुढे शिवसेनेने आमच्याशी पंगा घेतला तर आम्ही जशास तसे उत्तर देणार, असा इशाराही चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: BJP leader Chandrashekhar Bawankule ultimatum to MahaVikas Aghadi on OBC reservation.

हॅशटॅग्स

#OBC(33)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x