16 April 2024 11:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | एका वर्षात 113% परतावा देणारा 12 रुपयाचा शेअर कोसळणार? तज्ज्ञांचा इशारा काय? Adani Power Share Price | अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा दबावाखाली? शेअरमध्ये जबरदस्त अस्थिरता वाढणार? Bonus Shares | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पडणार, हे टॉप 3 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत पैसा वाढेल Suzlon Share Price | 1 वर्षात 416% परतावा देणारा शेअर तेजीत येणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Quant Mutual Fund | पगारदारांनो! महिना 1100 रुपयांची SIP बचत देईल 20 लाख रुपये, खास योजना सेव्ह करा Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची खास योजना 5,000 रुपयांच्या मासिक गुंतवणुकीवर देईल रु. 3,56,829 देईल Numerology Horoscope | 16 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल
x

कुठल्या काळात? मुंबई पोलिसांना गरज 'त्या' अत्याधुनिक घोड्यांची; सरकारने दिले 'हे' घोडे

Mumbai Police

मुंबई: आज मुंबई पोलिसांकडे उपलब्ध असलेल्या हत्यारांचा आढावा घेतल्यास गुन्हेगार, गँगस्टर आणि दहशतवाद्यांकडे देखील अत्याधुनिक हत्यारं असल्याचं समोर आलं आहे. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जर पोलिसांकडे अत्याधुनिक शस्त्र असती तर वेळीच दहशतवाद्यांना रोखता आलं असतं असा निष्कर्ष देखील समोर आला होता. आज पोलिसांच्या तुलनेत दहशतवादी आणि गुन्हेगार आधुनिक झाले आहेत हे सत्य आहे. राज्य सरकारने देखील पोलिस दलाच्या अत्याधुनिकीकरणासाठी भरीव निधी देण्याची गरज आहे. मात्र तसं होताना दिसत नाही.

पोलिसांना सामान्य लोकांच्या आणि शहराच्या रक्षणासाठी अत्याधुनिक घोड्यांची (हत्यारं) गरज असताना राज्य सरकारने त्यांना अश्व म्हणजे घोडे देण्याचा निर्णय घेतला आहे. चांगल्या देखभालीची सोय नसल्याने मरोळ एलए विभागात पेट्रोलवर चालणारे चार पायांचे घोडे म्हणजे वाहन धूळ खात सडून गेली आहेत आणि त्यात सरकारने हे घोडे देऊन पोलिसांचा केवळ व्याप वाढविण्याचं काम केलं आहे अशी चर्चा रंगली आहे.

इतर विकसित देशात देखील अश्व स्कॉड आहेत, मात्र ते जुनी औपचारिकता म्हणून जसे भारतात राष्ट्रपती भवनात आहे. मात्र त्या विकसित देशात पोलिसांना अत्याधुनिक शस्त्र देण्यात सरकारने कोणतीही कमतरता ठेवलेली नाही. आधीच आधुनिक हत्यारं नाहीत आणि त्यात असलेली हत्यारं देखील गरजेच्या वेळी चालविण्याची मान्यता नाही. त्यात दिवसेंदिवस शहरातील आंदोलनं आणि मोर्चे हिंसक होत चाललेली आहेत जेथे पेट्रोल बॉम्ब आणि जाळपोळ सहज केली जाते. अशावेळी मोर्चे, आंदोलनाच्या बंदोबस्ताची जबाबदारी अश्वदलावर सोपविली जाणार आहे. त्याचबरोबर रात्रगस्त व पेट्रोलिंग करण्याचे कामही या दलाकडून करुन घेण्यात येणार आहे. त्यामुळे त्या प्राण्यांचा जीव देखील वेठीस लावला जाणार आहे. त्यामुळे यावर विरोधकांनी देखील खोचक टीका केली आहे.

मुंबई पोलीस दलात येत्या २६ जानेवारीपासून अश्वदल पुन्हा कार्यरत केले जाणार आहे. मरोळ येथील पोलीस मैदानावर घोडेस्वाराचे प्रशिक्षण अन्य सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रविवारी दिली होती. ब्रिटिश काळात मर्यादित लोकसंख्या असताना त्यांच्या जिवीत व मालमत्तेच्या सुरक्षेची जबाबदारी अश्वदलावर होती. पुन्हा एकदा शहरात ३० अश्व आणि त्यावर स्वार वर्दीधारी सिमेंटच्या रस्त्यावर दौड करताना दिसणार आहेत. एकेकाळी मुंबईची शान राहिलेल्या अश्वदलाचा तब्बल ८८ वर्षाच्या खंडानंतर पुन्हा त्यांच्या नाळेचा आवाज खडखडणार आहे.

सशस्त्र विभागाच्या (एलए)च्या अखत्यारित अश्वदलाची जबाबदारी राहणार आहे. मोर्चे, आंदोलनाच्या बंदोबस्ताची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली जाणार आहे. त्याचबरोबर रात्रगस्त व पेट्रोलिंग करण्याचे कामही या दलाकडून करुन घेण्यात येणार आहे. पोलिसांच्या अश्वदलामध्ये ३० घोडे असणार असून प्रत्येकी एक फौजदार व सहाय्यक फौजदार असतील. तर ४ हवालदार व ३२ कॉन्स्टेबलचा समावेश असणार आहे. फौजदाराकडून या दलाच्या समन्वयाची जबाबदारी सांभाळली जाणार आहे.

 

Web Title:  Mumbai Police need advanced weapons to protect city.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x