25 April 2024 1:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला
x

चक्रीवादळ रोखण्यात राज्य सरकार अपयशी, भाजपचे शिष्टमंडळ राष्ट्रपती भवनात, काँग्रेसचा टोला

Mahavikas Aghadi, Congress Leader Atul Londhe

मुंबई, ३ जून: अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे महाराष्ट्रासमोर नवं संकट उभं राहिलं होतं. दुपारी १:३० वाजता चक्रीवादळानं कोकण किनारपट्टीवरून जमिनीवर पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर अलिबाग मार्गे हे वादळ मुंबईत दाखल होणार होतं. त्यापूर्वीच वादळानं दिशा बदलली असून, चक्रीवादळ पनवेल, कर्जत खोपोली, नाशिक या मार्गे पुढे जाणार आहे. पुणे वेधशाळेचे प्रमुख हवामान संशोधक डॉ. अनुपम कश्यपी यांच्या हवाल्यानं स्कायमेटनं हे वृत्त दिलं आहे.

अनेक ठिकाणी झाडं पडल्याने मालमत्तेचं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र अजून पर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचं अधिकृत वृत्त नाही. दरम्यान, मागील काही दिवसांपासून भाजपचे अनेक नेते आणि शिष्टमंडळाने राज्यपालांच्या भेटींचा सपाटा लावून राज्य सरकारला लक्ष केलं होतं. त्यात काही नेत्यांनी तर राज्यपालांकडे थेट राष्ट्रपती राजवटीची मागणी केली होती.

त्याचाच धागा पकडून काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी भारतीय जनता पक्षाला खोचक टोला लगावला आहे. आजच्या निसर्गचक्रीवादळाचा संदर्भ घेऊन त्यांनी भाजपाची खिल्ली उडवली आहे. त्यांनी ट्विट करताना म्हटलं आहे की, “चक्रीवादळ मुंबईत दाखल होणार हे माहित असूनही राज्य सरकार ते रोखण्यात अपयशी….भाजपाचे शिष्टमंडळ आता थेट राष्ट्रपती भवनात.

काय आहे नेमकं ट्विट;

 

News English Summary: Congress spokesperson Atul Londhe has slammed the Bharatiya Janata Party. He has ridiculed the BJP by referring to today’s cyclone. He tweeted, “Despite knowing that the cyclone will hit Mumbai, the state government has failed to stop it. The BJP delegation is now directly at the Rashtrapati Bhavan.”

News English Title: Congress spokesperson Atul Londhe criticized BJP Party over politics against MahaVikas Aghadi News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x