28 May 2022 3:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Fake Reviews on e-Commerce | ई-कॉमर्स वेबसाइट्सवरील बनावट रिव्ह्यू | ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्यांवर लगाम लागणार Tata AIA Life Insurance | टाटा एआयए स्मार्ट व्हॅल्यू इन्कम इन्शुरन्स प्लॅन लाँच | पॉलिसीचे फायदे जाणून घ्या Multibagger Penny Stocks | अदाणींची या कंपनीत एन्ट्री | 1 महिन्यांत 7 रुपयांच्या शेअरने 160 टक्के परतावा Tesla Motors | भारतात होणार जगप्रसिद्ध टेस्ला कारचे उत्पादन? | एलॉन मस्क यांनी दिली मोठी माहिती CIBIL Score | चांगला सिबिल स्कोअर म्हणजे काय ज्यावर तुम्हाला क्रेडिट कार्ड मिळेल | स्कोअर असा तपासा Drone Company Stocks | या 5 ड्रोन कंपन्यांचे शेअर्स खरेदीचा आताच विचार करा | दीर्घकाळात करोडपती व्हाल 1 June Rules | 1 जूनपूर्वी तुमची आवडती कार, बाईक किंवा स्कूटर खरेदी करा | नंतर खर्च किती वाढणार पहा
x

ED चौकशीनंतर | वर्षा राऊत यांनी कर्जाचे ५५ लाख केले परत पण....

MP Sanjay Raut, wife Varsha Raut, ED Notice

मुंबई, २५ जानेवारी: पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी प्रवीण राऊत याच्या पत्नीकडून घेतलेले ५५ लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनी परत केलं आहे. सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) चौकशीसाठी समन्स बजावल्यानंतर वर्षा राऊत यांनी हे पाऊल उचललं आहे.

वर्षा राऊत यांची चार जानेवारीला ईडीच्या अधिकाऱ्यांनी सुमारे साडेतीन तास चौकशी केली होती. पीएमसी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल असलेल्या प्रवीण राऊत यांच्या खात्यावरून वर्षा राऊत यांच्या खात्यावर ५५ लाख रुपये वर्ग करण्यात आले होते. तसेच त्यांच्या चार कंपन्यांतील भागीदारीच्या अनुषंगाने त्यांच्याकडे विचारणा करण्यात आली होती.

हा पैसा गुन्ह्यातील असल्याने वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावलं होतं. आता वर्षा राऊत यांनी हे पैसे परत केले आहेत. पैसे परत केले तरी गुन्ह्यातील पैसे घेतले असल्याने त्यांच्याबाबत असलेले आरोप संपत नसल्याचं ईडी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे वर्षा राऊत यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

News English Summary: Shiv Sena MP Sanjay Raut’s wife Varsha Raut has repaid an interest-free loan of Rs 55 lakh taken from PMC Bank scam accused Praveen Raut’s wife. Varsha Raut has taken this step after the Directorate of Recovery (ED) issued summons for inquiry.

News English Title: MP Sanjay Raut wife Varsha Raut return 55 lakhs of loan amount news updates.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(255)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x