5 June 2023 1:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IKIO Lighting Share Price | आला रे आला IPO आला! IKIO लायटिंग IPO साठी पैसे तयार ठेवा, शेअर ग्रे मार्केटमध्ये धमाल करतोय Rajasthan Congress | राजस्थान काँग्रेसच्या गहलोत सरकारच्या कामगिरीवर जनता खुश, सर्व्हेतील धक्कादायक आकडेवारीने भाजपचं टेंशन वाढणार Multibagger Stocks | झटपट पैसा! एक आठवड्यात 73 टक्के पर्यंत बंपर परतावा देतं आहेत हे शेअर्स, लिस्ट सेव्ह करा Alkyl Amines Chemicals Share Price | करोडपती स्टॉक! अल्काइल अमाइन केमिकल्स शेअरने गुंतवणुकदारांना 60000 टक्के परतावा दिला Anmol India Share Price | मालामाल शेअर! अनमोल इंडिया शेअरने 843% परतावा दिला, आता एका शेअरवर 4 फ्री बोनस शेअर्स मिळणार My EPF Money | पगारदारांनो! EPF कट होतं असेल तर लक्ष द्या, हे लोकच काढू शकतात पैसे, या कागदपत्रांची असेल गरज Loksabha Election 2024 | 2024 लोकसभेसाठी 9 वर्षात गमावलेल्या मित्रपक्षांपुढे भाजप हात पसणार, भाजप गुजरात लॉबीवर कोण विश्वास ठेवणार?
x

अण्णा हजारे यांचे पंतप्रधानांना पत्र | शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दिल्लीत आंदोलन करणार

Anna Hajare, PM Narendra Modi, Farm laws

राळेगणसिद्धी, २५ जानेवारी: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आपण जानेवारी महिन्याच्या अखेरीस आंदोलन करणार आहोत. हे आपले अखेरचे आंदोलन असेल असे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे. आपणास आंदोलन करण्याची परवानगी दिली नाही तरीही आपण आंदोलनास बसणार असल्याचे अण्णांनी पंतप्रधानांना दिलिहेल्या पत्रात म्हटले आहे. (Anna Hajare wrote a letter to PM Narendra Modi regarding farm laws)

कृषी विधेयकं आणि शेतकऱ्यांचे प्रश्न आदींवरुन केंद्र सरकार आगोदरच अडचणीत आहे. राजधानी दिल्लीच्या सीमेवर पाठिमागील 50 दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यामुळे आगोदरच अडचणीत असलेले केंद्र सरकार अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

अण्णा हजारे यांनी पंतप्रधानांना लिहिलेले पत्र आपल्या फेसबुकवर शेअर केले आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार अण्णा हजारे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, त्यांनी रामलीला मैदानावर उपोषण आणि आंदोलनासाठी 4 वेळा परवानगी मागितली होती. परंतू, त्यांनी पाठवलेल्या एकाही पत्राला आतापर्यंत एकदाही उत्तर दिले नाही. अण्णानी हेही म्हटले आहे की, या आधी भाजप नेत्यांनी माझे जोरदार कौतुक केले होते. परंतू, आता ते नेते एकाही पत्राचे उत्तर देत नाहीत, असा टोलाही हजारे यांनी लगावला आहे.

जनवरी में अनशन करने के बारे में…
https://drive.google.com/file/d/1atEkbIwWjETSQrYzg6DVuzW4OyyW4phZ/view?usp=sharing

Posted by Anna Hazare on Thursday, January 14, 2021

 

News English Summary: Senior social activist Anna Hazare has once again written a letter to Prime Minister Narendra Modi warning of agitation. Anna Hazare said that we will agitate on the issues of farmers at the end of January. Anna Hazare has said that this will be his last agitation. “Even if you are not allowed to protest, you will join the protest,” Anna said in a letter to the Prime Minister.

News English Title: Anna Hajare wrote a letter to PM Narendra Modi regarding farm laws news updates.

हॅशटॅग्स

#Anna Hajare(18)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x