8 August 2022 9:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
प्रचंड महागाई, बेरोजगारीवर जनता मोदींवर खूप | भाजप नेते दरेकरांच्या उन्मत्त प्रतिक्रियेवर महिलांकडून शिव्या श्राप, व्हिडिओ पहा Guru Vakri 2022 | मीन राशीत गुरू ग्रहाची 118 दिवस उलटी हालचाल, 12 राशींच्या लोकांच्या जीवनात होणार मोठा बदल IRCTC Train Ticket Rules | ट्रेनचं तिकीट नसले तरी टीटीई ट्रेनमधून उतरवू शकत नाही, जाणून घ्या हा नियम Syrma SGS Tech IPO | सिरमा एसजीएस टेक कंपनी 840 कोटींचा आयपीओ लाँच करणार, कंपनीचा तपशील जाणून घ्या PPF Vs ELSS | या दोन जबरदस्त योजनांपैकी परतावा आणि टॅक्स सूट मिळवण्यासाठी कोणती योजना सर्वोत्तम, अधिक जाणून घ्या Horoscope Today | 09 ऑगस्ट 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mutual Fund SIP | म्युच्युअल फंडातून 50 लाखांचा परतवा मिळवण्यासाठी दरमहा किती SIP करावी लागेल जाणून घ्या, नफ्यात राहा
x

भातखळकरांचं परप्रांतीयांवरून प्रेम उफाळून आलं? | 'या' राज्यात भाजप सरकारने केली होती परप्रांतीयांविरुद्ध मोहीम

MLA Atul Bhatkhalkar

मुंबई, १४ सप्टेंबर | भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. महाराष्ट्रात घडणाऱ्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर परप्रांतीयांची नोंद ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यावर अतुल भातखळकर यांनी आक्षेप घेत, तक्रार दाखल केली आहे. कांदिवलीतील समता नगर पोलिसात ही तक्रार दाखल करण्यात आली.

भातखळकरांचं परप्रांतीयांवरून प्रेम उफाळून आलं?, ‘या’ राज्यात भाजप सरकारने केली होती परप्रांतीयांविरुद्ध मोहीम – BJP MLA Atul Bhatkhalkar file complaint after CM Uddhav Thackeray orders to register every outsiders name with details :

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य हे दोन समाजात तेढ निर्माण करणारे आहे. या वक्तव्याने एक समाज भयभीत झालेला आहे. जर परप्रांतीय गुन्हेगार असतील तर शिवसेना नेते संजय राठोड, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे कुठल्या प्रांतातून आले आहेत? मुख्यमंत्र्यांविरोधात कलम 154अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे, असं अतुल भातखळकर यांनी सांगितलं.

गोव्यात उत्तर भारतीयांविरोधात भाजप सरकारने केली होती कारवाई:
भाजपाची सत्ता असलेल्या गोव्यात जुलै १०२९ मध्ये परप्रातीयांच्या मुद्द्याने पेट घेतला होता. गोव्याच्या विविध भागात थेट पोलिसांनाच कारवाईचे आदेश गोव्यातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने दिले होते. गोव्यातील अनेक महत्वाच्या ठिकाणांवरून तसेच सामान्यांना त्रासदायक ठरणाऱ्या ठिकाणावरून परप्रांतीयांना पोलिसच पळवून लावत होते. गोवा सरकारच्या या धडक कारवाईचं स्थानिक लोकांनी देखील कौतुक केले होते.

Goa-Uttar-Bharatiya

गोव्यात परप्रांतीय मैदानावर बिनधास्त झोपा काढत असतात आणि महिलांना येथून प्रवासादरम्यान देखील अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे माजी सैनिक कल्याण संघटनेने यासंदर्भात मुख्यमंत्री प्रमोद सावंत, आमदार बाबूश मोनस्रात, महापौर उदय मडकईकर आणि पणजी पोलिसांकडे या परप्रांतीयांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून पोलिसांनी परप्रांतीयांची हकालपट्टी सुरू केली होती.

गुजरातमध्ये एका घटनेनंतर उत्तर भारतीयांवर कारवाई:
ऑक्टोबर २०१९ मध्ये गुजरातमधील महिला संबंधित घटनेनंतर संपूर्ण गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवरून संतापाच वातावरण झाल्यानंतर हजारो परप्रांतीयांवर हल्ले करण्यात आले होते. विशेष म्हणजे त्यानंतर हजारो उत्तर भारतीयांनी रातोरात गुजरातमधून पलायन केलं होतं. मात्र या संपूर्ण घटनेनंतर भारतीय जनता पक्षातील आणि काँग्रेसमधील सर्व उत्तर भारतीय नेते अज्ञातवासात गेल्याचे दिसले होते.

धक्कादायक गोष्ट म्हणजे गुजरातमधील ज्या आमदार अल्पेश ठाकोर याने उत्तर भारतीयांवर हल्ले घडवून आणले होते त्यांना गोड पेढा भरवत भारतीय जनता पक्षातील नेत्यांनी भाजपात जाहीर प्रवेश दिला होता. त्यामुळे महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने उत्तर भारतीय प्रेम उफाळून आल्याचं म्हटलं जातंय.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: BJP MLA Atul Bhatkhalkar file complaint after CM Uddhav Thackeray orders to register every outsiders name with details.

हॅशटॅग्स

#AtulBhatkhalkar(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x