11 December 2024 9:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

पीडित नाईक कुटुंबियांसाठी ना दुःख ना आस्था | पण अर्नबच्या पायात त्यांना बरेच फोड दिसले

Amruta Fadnavis, twit, Arnab Goswami

मुंबई, ४ नोव्हेंबर: रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटक केल्याने खळबळ माजली आहे. रायगड पोलिसांनी धडक कारवाई करत अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथील घरातून ताब्यात घेत अटकेची कारवाई केली. दरम्यान, पोलिसांकडे कोणतीही कागदपत्रं, न्यायालयाचे आदेश किंवा समन्स नसतानाही ही धडक कारवाई केला जात असल्याचा आरोप रिपब्लिककडून यानंतर करण्यात आला आहे.

तसेच अर्णब गोस्वामी यांच्यावर पोलिसांकडून जबरदस्ती करत धक्काबुक्की केल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. सध्या पोलीस अर्णब गोस्वामी यांना घेऊन अलिबाग कोर्टात हजर केलं आहे. त्यानंतर, भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. त्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील सदर प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील एक अजब ट्विट केलं असून त्यात त्यांना नाईक कुटुंबियांबद्दल अजिबात आस्था असल्याचं पाहायला मिळत नाही, मात्र अलिशान आयुष्य जगणाऱ्या अर्नबच्या पायात फोड दिसत आहेत. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक शेर ट्विट करून अर्णब गोस्वामी यांचं कौतुक केलं आहे. “बहुत छाले है उसके पाओं में, कम्बख़्त उसूलों पे चला होगा!” असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे. यासोबतच ArnabGoswami, MaharashtraGovt, Death Of Democracy हे हॅशटॅग देखील वापरले आहेत.

 

News English Summary: After Opposition Leader Devendra Fadnavis, now his wife Amrita Fadnavis has also sent a strange tweet in which she does not seem to have much faith in the Naik family, but Arnab, who lives a luxurious life, has blisters on his legs. A lion tweeted from his Twitter account praising Arnab Goswami. “bahut Chaal Hai Uske Pao Me, Kambakat Usulope Chala Hoga!” That is what Amrita Fadnavis has said.

News English Title: Amruta Fadnavis twit over Arnab Goswami news updates.

हॅशटॅग्स

#Amruta Fadnavis(82)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x