26 July 2021 12:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Special Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी
x

शर्मिला ठाकरेंच्या पुढाकाराने व्हेंटिलेटरवरील वाडिया इस्पितळास अर्थमंत्र्यांकडून ४६ कोटी देण्याचं मान्य

Deputy Chief Minister Ajit Pawar, Sharmila Thackeray, Raj Thackeray, Amit Thackeray, Wadia Hospital

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आज उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यासाठी थेट मंत्रालयात दाखल झाल्या आहेत. या भेटीत त्या अजित पवार यांच्यासोबत वाडिया हॉस्पिटलच्या प्रश्नावर चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे. शर्मिला ठाकरे यांनी वाडियाचा प्रश्नात व्यक्तिगत लक्ष घातलं आहे. काल देखील त्यांनी स्वतः वाडिया येथील कर्मचाऱ्यांच्या आंदोलनस्थळी जाऊन त्यांच्या मागण्या समजून घेतल्या होत्या.

BhagyaVivah Marathi Matrimonial

अजित पवार यांच्या भेटीनंतर शर्मिला ठाकरे म्हणाल्या, “अजित पवार यांनी वाडियासाठी ४६ कोटी रुपये देण्याचं मान्य केलं आहे. राज्य सरकार आणि महापालिका मिळून हे पैसे देतील. अजित पवार यांनी शब्द दिलेला आहे. ते स्वतः अर्थमंत्री आहेत. त्यामुळे आर्थिक तरतूद करणं त्यांच्याच हातात होतं. म्हणूनच त्यांचीच भेट घेतली. कर्मचाऱ्यांचे वेतन आणि इतर गोष्टींसाठी १०५ कोटी रुपये बाकी आहेत. त्यावरही लवकरच निर्णय होईल.”

अत्यंत जुनं आणि लहान मुलांचं स्पेशलिस्ट असलेलं वाडिया रुग्णालय आता बंद होण्याच्या मार्गावर आहे, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली होती. त्यामुळे वाडियामधील सर्व रुग्ण, कर्माचारी आणि आजूबाजूच्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर काल लाल बावटा कामगार संघटनेकडून धरणे आंदोलन करण्यात येत आहे. त्यानंतर या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी देखील उपस्थिती लावली होती.

महापालिका अनुदानाची थकबाकी देत नसल्याने हॉस्पीटल बंद करावे लागणार असल्याचा दावा करणारे वाडिया प्रशासन आणि पालिकेने परस्परविरोधी दावे केले आहेत. मागील आठवड्यापासून वाडिया हॉस्पीटलने नव्या रुग्णांना दाखल करून घेण्याची प्रक्रियाही थांबवली आहे. अनुदानाअभावी वैद्यकीय सेवा आणि औषधांसह विविध सेवा देणाऱ्या व्हेन्डर्सना पैसे देता आलेले नाहीत. त्यामुळे रुग्णांसह, हॉस्पीटलच्या कर्मचाऱ्यांवरही ‘संक्रांत’ आली आहे.

“वाडिया हॉस्पीटल बंद झालं तर गोरगरीबांनी उपचारासाठी जायचं कुठे? महापालिका आणि संबंधित मंत्र्यांनी तातडीने बैठक घेऊन यावर तोडगा काढावा. काहीही झालं तरी हे हॉस्पीटल आम्ही बंद होऊ देणार नाही”, असा इशारा शर्मिला ठाकरे यांनी दिला होता. त्याच विषयाला अनुसरून शर्मिला ठाकरे यांनी पुढाकार घेऊन राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांची देखील आर्थिक मदतीसाठी भेट घेऊन पुढाकार घेण्याचं मान्य केलं होतं.

तत्पूर्वी, वाडिया रुग्णालयाचे अनुदान महापालिका नियमित देत असून राज्य सरकारने तीन वर्षांपूर्वी त्यांचे अनुदान बंद केल्यामुळे वाडिया आर्थिकदृष्ट्या संकटात आल्याचा दावा पालिकेतील विरोधी पक्षांनी केला आहे. राज्यात २०१४पासून देवेंद्र फडणवीस यांचे सरकार होते. त्यामुळे अनुदानाची जबाबदारी त्या सरकारची असल्याकडे मुंबई पालिकेतील विरोधी पक्षांनी लक्ष वेधले होते.

 

Web Title:  Meeting of Sharmila Thackeray with Finance Minister Ajit Pawar on Wadia Hospital issue.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(670)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x