11 December 2024 12:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल IPO GMP | आला रे आला IPO आला, गुंतवणुकीची मोठी संधी, पहिल्याच दिवशी मिळेल मोठा परतावा - GMP IPO 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, जानेवारी 2025 मध्ये महागाई भत्ता इतका वाढणार, अपडेट आली Shukra Rashi Parivartan | डिसेंबरच्या 'या' तारखेपासून शुक्र गोचरमुळे काही राशींना भोगावे लागू शकतात गंभीर परिणाम NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट होणार, तेजीचे संकेत - NSE: NTPCGREEN BEL Share Price | डिफेंस शेअरमध्ये तेजीचे संकेत, मिळेल मोठा परतावा, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: BEL
x

बहुमत सिद्ध करू सांगताना भाजप नेत्यांचे चेहरे पडले; एक ओळ बोलून निघून गेले

BJP Leader Chandrakant patil, BJP

मुंबई: महाराष्ट्रात स्थापन झालेल्या देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकारविरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयानं आज, मंगळवारी सकाळी महत्वपूर्ण निकाल दिला. महाराष्ट्रात उद्याच बहुमत चाचणी घ्यावी, असा आदेश कोर्टानं दिला. बहुमत चाचणीवेळी गुप्त मतदान नको, त्याचं लाइव्ह प्रक्षेपण करा, असे दिशानिर्देशही कोर्टाने दिले आहेत.

सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला आहे त्या निकालाचा (BJP Leader Chandrakant Patil on Maharashtra Floor Test ) आम्ही आदर करतो. उद्या विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी आम्ही तयार आहोत, आम्ही बहुमत सिद्ध करुन दाखवू, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर भाजप नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधून बहुमत सिद्ध करणारच असा विश्वास व्यक्त केला. मात्र धक्कादायकरित्या देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी शपथविधी घेतला त्या दिवशी राजभवनातून बाहेर चेहऱ्यावर मोठं हास्य आणि हात वर करत मोठी आवळत येणारे गिरीश महाजन यांचे आजच्या प्रतिक्रियेवेळी पडलेले चेहरे बरंच काही सांगून जातं होते. अगदी एका ओळीत प्रतिक्रिया देऊन हे नेते निघून गेल्याने उद्या काय होणार याचा प्रत्यय चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन या भाजप नेत्यांचे चेहरे पाहून अनेकांना आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात बंड करून भाजपला जाऊन मिळालेले व उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (NCP Leader Ajit Pawar) हे द्विधा मनस्थितीत आहेत. राष्ट्रवादीतील नेत्यांकडून होत असलेल्या सततच्या मनधरणीमुळं ते पुन्हा वेगळा विचार करत असल्याचं बोललं जातं. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अजितदादांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांची भेट घेतल्यानं त्यांच्या ‘घरवापसी’च्या चर्चेला जोर आला आहे.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीची (BJP Core Committee Meeting at varsha Niwas) वर्षा निवासवर बैठक बोलविण्यात आली आहे. विशेष म्हणजे या बैठकीला स्वतः अजित पवार देखील सामील झाले आहेत असं वृत्त होतं आणि त्याप्रमाणे ते वर्षा निवासवर हजर झाले, मात्र ते या तातडीच्या बैठकीला जास्त वेळ न थांबता लगेचच बाहेर पडले आणि बंधू श्रीनिवास पवार यांच्या निवासस्थानी पोहोचल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे त्यांना पुन्हा परतीच्या मार्गावर आणण्यासाठी स्वतः शरद पवारांनी पुढाकार घेतला असून राजकरण वेगळं ठेवून कुटुंब एकत्र ठेवण्यावर भर देण्यात आल्याने, त्याला संपूर्ण राष्ट्रवादीच्या नेत्यांनी साथ दिली आहे.

तत्पूर्वी, महाराष्ट्रातील सत्तापेचावर सर्वोच्च न्यायालयानं आज दिलेल्या निर्णयाचं काँग्रेसनं स्वागत केलं आहे. ‘न्यायालयाच्या या निर्णयामुळं देशाच्या राज्यघटनेचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. ‘देवेंद्र फडणवीस यांनी आता बहुमत चाचणीला सामोरं जाण्याआधीच राजीनामा द्यावा,’ अशी मागणी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

बहुमत चाचणीच्या मतदानाचं थेट प्रक्षेपण व्हावं, असे आदेश न्यायालयानं दिले आहेत. काँग्रेसनं या निर्णयावर समाधान व्यक्त केलं आहे. संविधान दिनी आलेला हा निर्णय देशाच्या राज्यघटनेचं महत्त्व अधोरेखित करणारा आहे. हा निर्णय म्हणजे राज्यघटनेचा सन्मान आहे, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

हॅशटॅग्स

#Chandrakant Patil(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x