15 December 2024 4:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

बहुमत चाचणी पूर्वीच फडणवीसांनी राजीनामा द्यावा: पृथ्वीराज चव्हाण

Congress, BJP, Devendra Fadnavis, Prithviraj Chavan

नवी दिल्ली: महाराष्ट्रातील सत्तापेचावर सर्वोच्च न्यायालयानं आज दिलेल्या निर्णयाचं काँग्रेसनं स्वागत केलं आहे. ‘न्यायालयाच्या या निर्णयामुळं देशाच्या राज्यघटनेचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. ‘देवेंद्र फडणवीस यांनी आता बहुमत चाचणीला सामोरं जाण्याआधीच राजीनामा द्यावा,’ अशी मागणी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

बहुमत चाचणीच्या मतदानाचं थेट प्रक्षेपण व्हावं, असे आदेश न्यायालयानं दिले आहेत. काँग्रेसनं या निर्णयावर समाधान व्यक्त केलं आहे. संविधान दिनी आलेला हा निर्णय देशाच्या राज्यघटनेचं महत्त्व अधोरेखित करणारा आहे. हा निर्णय म्हणजे राज्यघटनेचा सन्मान आहे, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर मंगळवारी सकाळी १०.३० वाजता सर्वोच्च न्यायालय राखून ठेवलेला आपला निर्णय देणार आहे. शनिवारी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन सरकार स्थापन केलं. त्या शपथविधीविरोधा शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर २ दिवस म्हणजे रविवार आणि सोमवार सुनावणी झाली. सोमवारी कागदपत्र सादर करण्यात आले आणि दोन्ही पक्षाकारांची बाजू न्यायालयानं ऐकून घेतली आणि आपला निर्णय राखून ठेवला होता आणि त्यावर आज अंतरिम निकाल देणार असल्याचं म्हटलं जातं होतं.

राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापन करण्यास पाचारण करण्याचा निर्णय बेकायदा असल्याचा मुद्दा उपस्थित करत या निर्णयाला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका केलेली आहे. त्यावर थोड्याच वेळात न्या. एन. व्ही. रमण, न्या. अशोक भूषण आणि न्या. संजीव खन्ना यांच्या तीन सदस्यीय खंठपीठासमोर सुनावणी होत आहेत. न्यायमूर्ती दाखल झाले असून दोन्ही पक्षाकारांचे वकील न्यायालयात हजर झाले आहेत.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने उद्यापर्यंत बहुमत चाचणी सिद्ध करण्याचे आदेश. उद्या संध्याकाळी ५ पर्यंत बहुमताची प्रक्रिया पूर्ण करावी आणि त्याचे व्हिडिओ शूटिंग करावे असा आदेश देण्यात आला आहे. तसेच हंगामी अध्यक्षांच्या अधिकारात ही बहुमत चाचणी घ्यावी असं म्हटलं आहे.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीची वर्षा निवासवर बैठक बोलविण्यात आली आहे. विशेष म्हणजे या बैठकीला स्वतः अजित पवार देखील सामील झाली आहेत असं वृत्त आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे बहुमत चाचणी होईल तेव्हा आमच्याकडे १७० आमदारांचा पाठिंबा असेल असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. यावेळी त्यांनी राज्यपालांच्या साक्षीने संविधानाची हत्या करण्यात आली असल्याचा आरोप केला. ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलात झालेला कार्यक्रम हा महाविकास आघाडीचं शक्तीप्रदर्शन नव्हतं, तर १६२ आमदार सोबत आहेत हे राज्यपाल आणि राष्ट्रपतींना दाखवलं असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x