28 June 2022 5:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Home Loan Top-Up | कर्जाच्या ईएमआयने घराशी संबंधित खर्च भागत नाही? | टॉप-अपचा पर्याय निवडा RD Vs SIP | या 2 पर्यायांपैकी कशामध्ये दर महिन्याला रु. 2000 गुंतवणूक करणे अधिक योग्य आहे | फायद्याचं गणित जाणून घ्या Maharashtra Govt Recruitment | महाराष्ट्र पोलीस भरती संबंधित नवीन जीआर प्रसिद्ध | संपूर्ण GR वाचा शिवसेना पूर्णपणे संपविण्यासाठी दिल्लीत जोरदार बैठका | आता शिंदेंवर सेनेचे खासदार फोडण्यासाठी दबाव वाढवला? शिंदेसोबत बैठकीसाठी फडणवीस दिल्लीला | सोबत वकिल महेश जेठमलानी सुद्धा | शिंदे गट कायद्याच्या कचाट्यात एकनाथ शिंदे गट कायदा आणि घटनात्मक चौकटीत फसतोय | शिंदे भाजप नेत्यांसोबत बैठकीसाठी दिल्लीत Multibagger Stocks | 3 वर्षांत 190 टक्के रिटर्नसह 250 टक्के लाभांश | हा शेअर तुमच्याकडे आहे?
x

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना केवळ १० वर्षांसाठी आरक्षण हवं होतं : सुमित्रा महाजन

रांची : लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी आरक्षणावर आश्चर्यकारक विधान केलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना केवळ १० वर्षांसाठी आरक्षण हवं होतं असं थेट विधान त्यांनी एका कार्यक्रमात केलं आहे. शिक्षण तसेच नोकरीमध्ये कायमचं आरक्षण मिळणं हे योग्य आहे का, असा प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थित केला आहे. त्यांच्या या विधानामुळे वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.

रांचीमध्ये सुरू असलेल्या ४ दिवसीय लोकमंथन कार्यक्रमात त्या उपस्थितांसमोर बोलत होत्या. दरम्यान त्या म्हणाल्या की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सांगितलं होतं, की आरक्षण केवळ १० वर्षांकरिता आवश्यक आहे. परंतु आरक्षणानं देशाचं कल्याण होणार आहे काय ?, असा प्रश्न सुद्धा सुमित्रा महाजन यांनी उपस्थित केला आहे. परंतु असं असलं तरी देशाला पुढे नेण्यासाठी आंबेडकरांनी दिलेल्या मार्गानं चालणं गरजेचं आहे अशी टिपणी सुद्धा त्यांनी जोडली.

जोपर्यंत तुमच्या मध्ये देशाबद्दलची भक्ती वाढणार नाही, तोपर्यंत देशाचा विकास अशक्य आहे. संसद दिवसेंदिवस आरक्षण वाढवत चाललं आहे. प्रत्येक वेळी १० वर्षांसाठी आरक्षण वाढवलं जातंय. एकदा तर आरक्षणाची मुदत तब्बल २० वर्षांसाठी वाढवण्यात आली होती आणि असं कधीपर्यंत चालणार आहे असं प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. आमच्या सरकारनं धर्म परिवर्तनविरोधी कायदा केला.

हॅशटॅग्स

BJP(446)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x