22 May 2024 3:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | तज्ज्ञांकडून SJVN शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 615% परतावा देणारा स्टॉक तुफान तेजीत वाढणार Tata Steel Share Price | टाटा स्टील स्टॉक टेक्निकल चार्टवर मजबूत तेजीचे संकेत, सपोर्ट प्राईससह टार्गेट प्राईस जाणून घ्या IFCI Share Price | IFCI आणि IRFC सहित या 13 शेअर्समध्ये मोठं ट्रेडिंग व्हॉल्यूम, शेअर्समध्ये तुफान तेजीचे संकेत Penny Stocks | हे टॉप 7 चिल्लर प्राईस पेनी स्टॉक श्रीमंत करतील, रोज अप्पर सर्किट हीट, फायदा घेणार? Vodafone Idea Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉक रेटिंग अपग्रेड, कंपनीचा वाईट काळ संपला? शेअर मजबूत तेजीत वाढणार IRFC Share Price | 1 वर्षात 420% परतावा दिला, तर मागील 5 दिवसात 18.37% परतावा, अजून 'BUY' करावा? IREDA Share Price | IREDA स्टॉकला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर
x

सेनेच्या नगरसेवकांनी शिवरायांचा अवमान करणाऱ्या छिंदमचा पाठिंबा मागितला, ऐकवली ऑडिओ क्लिप

अहमदनगर : महापौर निवडणुकीसाठी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार बाळासाहेब बोराटे यांनीच माझ्याकडून पाठिंबा मागितला, त्यामुळे त्यांच्याच विनंती आणि मागणीनुसार मी शिवसेनेला मतदान केलं असं स्पष्टीकरण शिवरायांबद्दल अवमानकारक वक्तव्य केलेल्या श्रीपाद छिंदम याने प्रसार माध्यमांशी संबंधित विषयावरून संवाद साधताना दिलं आहे.

दरम्यान, महापौर निवडणुकीदरम्यान छिंदम याने शिवसेनेचे उमेदवार बाळासाहेब बोराटे यांना मतदान केले. त्यानंतर सभागृहात छिंदम याला मारहाण झाल्याचा दावा शिवसेनेच्या नगरसेवकांनी केला. छिंदम हा अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आला आहे. त्यामुळे तो कोणाला मतदान करणार याकडे सर्वांचे लक्ष होते. त्यानुसार त्याने शिवसेनेचे उमेदवार बाळासाहेब बोराटे यांना मतदान करण्यासाठी हात उंचावला. त्यावेळी तिथे धक्काबुक्की झाल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, प्रसार माध्यमांशी संवाद साधताना छिंदम म्हणाला, बाळासाहेब बोराटे यांनी मला मतदान करण्याची विनंती केली. इतकंच नाही तर शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी मला मतदान करण्यास सांगितले. त्या सर्वांचे माझ्याकडे कॉल रेकॉर्डिग आहे. दरम्यान, सभागृहात मतदानावेळी मी बोराटे यांना मतदान करत असताना मला रोखण्यात आले. माझ्यावर हात उचलण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या नगरसेवकांनी त्यावेळी केला. परंतु, हात उचलणारे नगरसेवक पळकुटे आहेत. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचे छिंदम याने सांगितले. शिवसेनेकडून माझ्या जिवितास धोका असल्याचेही त्याने यावेळी सांगितले.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x