16 June 2024 7:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 16 जून 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 16 जून 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Income Tax on Salary | नोकरदारांनी ITR भरताना या 10 चुकांपैकी एकही चूक केल्यास महागात पडेल, तुम्ही केली का? Rites Share Price | PSU शेअरची तुफान खरेदी सुरू, फायद्याची अपडेट आली, अल्पावधीत मिळेल मोठा परतावा Kaya Share Price | खरेदी करा हा शेअर! 3 दिवसात दिला 69% परतावा, शॉर्ट टर्ममध्ये मोठा परतावा मिळतोय Bonus Share News | संधी सोडू नका! ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, पैशाने पैसे वाढवा BEL Share Price | डिफेन्स शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत, या बातमीनंतर खरेदीला ऑनलाईन गर्दी
x

Tata Steel Share Price | टाटा स्टील स्टॉक टेक्निकल चार्टवर मजबूत तेजीचे संकेत, सपोर्ट प्राईससह टार्गेट प्राईस जाणून घ्या

Tata Steel Share Price

Tata Steel Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा स्टील कंपनीचे शेअर्स मंगळवारी 4 टक्के वाढीसह 175.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ही शेअर्सची 52 आठवड्यांची नवीन उच्चांक किंमत आहे. नुकताच टाटा स्टील कंपनीने पोर्ट टेलबॉट प्रकल्पासाठी ब्रिटनस्थित नॅशनल ग्रिड पीएलसी कंपनीसोबत करार केला आहे. ( टाटा स्टील कंपनी अंश )

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा स्टील कंपनीच्या शेअर्सने 18 नोव्हेंबर 1992 रोजी सूचीबद्ध झाल्यानंतरची सर्वोच्च किंमत पातळी स्पर्श केली आहे. मागील 12 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 65.52 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सची किंमत 24.5 टक्के वाढली आहे.

मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 260 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. 1999 पासून आतापर्यंत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2,408.63 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज बुधवार दिनांक 22 मे 2024 रोजी टाटा स्टील स्टॉक 0.34 टक्के घसरणीसह 173.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

टाटा स्टील कंपनीने 2027 पर्यंत पोर्ट टॅलबोट येथे 3.2 दशलक्ष टन इलेक्ट्रिक आर्क फर्नेस उर्जा देण्यास सक्षम इन्फ्रा तयार करण्यासाठी ब्रिटीश इलेक्ट्रिक सिस्टम ऑपरेटरसोबत करार केला आहे. टाटा स्टील कंपनीचा आढावा घेणाऱ्या 42 पैकी 17 तज्ञांनी टाटा स्टील स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग जाहीर केली आहे. तर 18 जणांनी स्टॉक ‘होल्ड’ करण्याचा सल्ला दिला आहे. सात जणांनी हा स्टॉक विकण्याचा सल्ला दिला आहे.

अरिहंत कॅपिटल मार्केट्स फर्मच्या तज्ञांच्या मते, टाटा स्टील स्टॉक दैनंदिन टेक्निकल चार्टवर मजबूत वाढीचे संकेत देत आहे. तज्ञांच्या मते, पुढील काही आठवड्यांत टाटा स्टील स्टॉक 185 रुपये ते 195 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. दैनंदिन चार्टवर या स्टॉकमध्ये 182 रुपये किमतीवर प्रतिकार पाहायला मिळत आहे.

टिप्स 2 ट्रेड्स फर्मच्या तज्ञांच्या मते, टाटा स्टीलने 168 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट तयार केला आहे. जर हा स्टॉक 168 रुपये किमतीच्या जवळ आला तर शेअर 144 रुपयेपर्यंत खाली येऊ शकतो. आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स फर्मच्या तज्ञांच्या मते, मागील काही महिन्यांपासून टाटा स्टील स्टॉक 158 रुपये ते 170 रुपये रेंजमध्ये ट्रेड करत आहे. तेजीच्या काळात हा स्टॉक 194 रुपये किंमत स्पर्श करू शकतो.

टाटा ग्रुपचा भाग असलेला टाटा स्टील स्टॉक 5 दिवस, 10 दिवस, 150 दिवस आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग ॲव्हरेज किमतीच्या वर ट्रेड करत आहे. टाटा स्टील कंपनीने अद्याप आपले मार्च 2024 ला संपलेल्या तिमाहीचे निकाल जाहीर केलेले नाही. टाटा स्टील कंपनीने 31 डिसेंबर 2023 रोजी संपलेल्या तिमाहीत 515 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Steel Share Price NSE Live 22 May 2024.

हॅशटॅग्स

#Tata Steel Share Price(69)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x