27 July 2024 10:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा HFCL Share Price | 5G संबंधित HFCL सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा HUDCO Share Price | मल्टिबॅगर शेअरसाठी BUY रेटिंग, कंपनीबाबत अपडेट आली, यापूर्वी 400% परतावा दिला IPO GMP | स्वस्त IPO आला रे! ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी मिळेल 100% परतावा
x

जळगावमध्ये शिवसेनेला जोरदार धक्का; तर इतर पक्षातील उमेदवार 'आयात'नीती भाजपच्या पथ्यावर

जळगाव : शिवसेनेचे माजी मंत्री तसेच जळगांव मधील दिग्गज नेते सुरेश जैन यांना जळगांव महानगर पालिका निवडणुकीत जोरदार धक्का बसला आहे. भाजपने स्पष्ट बहुमताकडे वाटचाल केली आहे. निवडणुकीपूर्वी इतर पक्षातील नगरसेवक फोडून स्वतःकडे आणल्याचा फायदा त्यांना या निवडणुकीत झाला आहे. परंतु शिवसेनेचा मात्र धुव्वा उडाला आहे. त्यामुळे सुरेश दादांच्या कारकिर्दीचा सूर्यास्त जवळ आल्याची चर्चा जळगावच्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

मागील ३५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या सुरेश जैन यांच्या गटाला धक्का देत भाजपने जळगाव महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळवित सत्तांतर घडवून आणले. त्यात इतर पक्षातील आयात केलेल्या उमेदवारांचा सुद्धा मोठा वाटा आहे. भाजपने १२ वाजेपर्यंत ७५ पैकी तब्बल ५७ जागांवर आघाडी घेतली होती. तर दुसरीकडे स्वतःला प्रमुख प्रतिस्पर्धी समजणारी शिवसेना मात्र १४ जागांवर आघाडीवर होती.

मागील निवडणुकीत भाजपला केवळ १२ जागांवर समाधान मानावे लागले होते. यावेळेस खानदेश विकास आघाडीच्या अंतर्गत ही निवडणूक न लढता सुरेश जैन यांनी ही निवडणूक शिवसेनेच्या चिन्हा अंतर्गत घडलेली आहे. भाजप- शिवसेना स्वबळावर निवडणूक लढत होती तर या निवडणुकीमध्ये गिरीश महाजन, सुरेश जैन आणि एकनाथ खडसे या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती.

हॅशटॅग्स

#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x