13 December 2024 12:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Sita Ramam | दक्षिणेत हा चित्रपट चांगलाच गाजला, आता 'सिता रामम्' चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज

Sita Ramam

Sita Ramam | दिवसेंदिवस प्रेक्षकांमधील चित्रपटातील कथांबाबतचे मत वरचढ होत चालले आहे. त्याच त्याच कथा असल्यानंतर प्रेक्षक चित्रपटांना ट्रोल किंवा बॉयकॉट करत आहेत. दरम्यान, हिंदी चित्रपटातील बरेचसे कलाकार दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये दिसून येत आहेत. तर दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील कलाकार हिंदी चित्रपटामध्ये दिसून यायला लागले आहेत. दाक्षिणात्य भागांमध्ये चाहत्यांचा आवडता कलाकार अभिनेता दुलकर सलमान जर्सी फेम अभिनेत्री मृणाल ठाकूर सोबत लवकरच स्क्रिन शेअर करणार आहे. या जोडीचा ‘सिता रामम्’ चित्रपट लवकरच चित्रपट गृहांमध्ये दाखल होणार आहे. मल्याळम कलाकाराने आपल्या अभिनयाची जादू दक्षिणेत सोडली म्हणायला हरकत नाही. मात्र हिंदी पट्ट्यात ‘सिता रामम्’चा प्रभाव काही खास नाही पडला.

जोरदार प्रमोशन करूनही हिंदी पट्ट्यात चित्रपट गाजला नाही
मल्याळम कलाकाराने आपल्या अभिनयाची जादू दक्षिणेत सोडली. दक्षिणेत हा चित्रपट चांगलाच गाजला आहे. ‘सिता रामम्’ चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करण्यात आले होते, मात्र या चित्रपटाने हिंदी पट्ट्यात काही खास कमाल केली नाही. ‘सिता रामम्’ चित्रपटगृहांमध्ये दाखल झाला आहे मात्र काही खास कमाल करू न शकल्याने आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे.

‘सिता रामम्’ प्रेमकथेची ओटीटी रिलीज डेट समोर
‘सिता रामम्’ चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाला आहे मात्र या चित्रपट काही खास कमाल करू न शकल्याने आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. दरम्यान, OTT प्लॅटफॉर्म Amazon प्राइम व्हिडिओने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर ‘सिता रामम्’ चे पोस्टर शेअर करण्यात आले आहे. यावेळी चित्रपटाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 9 सप्टेंबरपासून तुम्ही अॅमेझॉन प्राइम वर ‘सिता रामम्’ चित्रपट बघू शकणार आहेत.

चित्रपटाने जोरदार कमाई केली
‘सिता रामम्’ चित्रपटाने हिंदी टप्प्यांमध्ये कमाल केली नसली तरी, दक्षिण भारतीय भागांमध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने भरगोस कमाई केली आहे. समीक्षकांनी चित्रपटाचे भरभरून कौतुक केले आहे. गेल्या 2 सप्टेंबर रोजी हिंदी पट्ट्यामध्ये ‘सीता रामम’ थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. थिएटरमध्ये चित्रपटाने काही कमाल न केल्याने आता OTT वर प्रेक्षकांसमोर चित्रपट आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

‘सिता रामम्’ एक उत्कृष्ट प्रेमकथा
हनु राघवपुडी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शिन केले आहे. या चित्रपटाची कथा प्रेमावर आधारित आहे. दरम्यान, या चित्रपटाची कथा 60 आणि 80 च्या दशकातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. या चित्रपटामध्ये दुलकर सलमान सैनिकाच्या भूमिकेत आहे, तर अभिनेत्री मृणाल ठाकूर त्याच्या मैत्रिणीच्या भूमिकेत दिसून येत आहे. या चित्रपटाने हिंदी मध्ये खास कमाल केली नाही मात्र तमिळ, तेलगू आणि मल्याळम भाषांमध्ये 37.80 कोटींचा व्यवसाय केला. चित्रपटाचे बजेट 30 कोटी होते तरी तिन्ही भाषांमध्ये या चित्रपटाने खर्चाच्यावर कमाई केली. या चित्रपटामध्ये सलमान आणि मृणाल सोबत रश्मिका मंदान्ना, सुमंत, गौतम वासुदेव मेनन, भूमिका चावला आणि धरुन भास्कर यांच्या महत्त्वाच्या भूमिकेमध्ये दिसून येत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Sita Ramam movie will be released on OTT Checks details 7 September 2022

हॅशटॅग्स

Sita Ramam(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x