5 August 2021 4:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
पूरस्थिती मुंबईतच नाही, जगभर निर्माण होतेय | तिथे तर महापालिका आमच्या ताब्यात नाहीत - मुख्यमंत्री Sarkari Naukri | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये 511 जागांसाठी भरती | ऑनलाईन अर्ज करा माविआ कधीही पडेल, राज्यपाल अत्यंत निष्ठावंत व कर्तृत्ववान | त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नसल्याने राग - अमृता फडणवीस पेगासस हेरगिरी | जर रिपोर्ट्स खरे असतील तर हा एक गंभीर मुद्दा - सर्वोच्च न्यायालय Special Recipe | सोपी कृती आणि कमी साहित्यात बनवा चटकदार भडंग - पहा रेसिपी उच्चांकी महागाईत अमृता फडणवीस यांचा पुणेकरांना अजब सल्ला | कोरोनाचे नियम पाळून खूप शॉपिंग करा युवासेनेत मोठे फेरबदल होणार | प्रथमच ठाकरे आडनावाबाहेरील व्यक्ती थेट युवासेना प्रमुख बनणार? - सविस्तर वृत्त
x

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे आरक्षण चार महिन्यांपूर्वीच फुल्ल

Ganeshotsav Konkan

मालवण, १८ जून | कोरोनाने मागील वर्षी देशात असे काही थैमान घातले होते, की सण उत्सवांवरही याचे सावट पाहायला मिळाले. हे चित्र यंदाच्या वर्षीही फारसे काही वेगळे नाही. कोकणच्या दिशेने जाणाऱ्या अनेक चाकरमान्यांना मागच्या वर्षी गावी जाणे शक्य झाले नव्हते. प्रशासनाचे नियम आणि कोरोनाचे संकट यांमुळे चाकरमान्यांचा हिरमोड झाला होता.

BhagyaVivah Marathi Matrimonial

गावाकडे मागील वर्षी बहुप्रतिक्षित अशा गणेशोत्सवाच्या निमित्ताने जाता न आल्यामुळे अनेकांनी यंदाच्या वर्षी गणेशोत्सव सुरु होण्याआधीच गावाकडे विशेष म्हणजे कोकणच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे तिकीट आरक्षित केले आहे. गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे तिकीट चार महिन्यांपूर्वीच बुक करत गावाला जाण्याचे अनेकांनीच निश्चित केले आहे.

कोकणच्या दिशेने गणेशोत्सव काळात जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. या वर्षी 10 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी आहे. या दिवसापासून गणेशोत्सवाची सुरुवात होत आहे. यासाठी 5 ते 9 सप्टेंबर दरम्यानच्या कोकणाकडे जाणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्या फुल्ल झाल्या आहेत. तर, घरगुती गणेश विसर्जनानंतर म्हणजेच 14 सप्टेंबरनंतर मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गाड्यांचे आरक्षणही फुल्ल झाल्याचे दिसत आहे. दुसरीकडे अद्यापही कोकणातील काही भागात कोरोनाचे सावट कायम आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: Reservation of express trains for Ganeshotsav in Konkan are full four months ago news updates.

हॅशटॅग्स

#Konkan(37)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x