21 October 2019 4:18 PM
अँप डाउनलोड

आज राज ठाकरेंची तोफ नाशकात धडाडणार, दत्तक नाशिकची पोलखोल होणार?

MNS, Raj Thackeray, Loksabha Election 2019

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज नाशिक शहरात जाहीर सभा होत आहे. शहरातील अनंत कान्हेरे मैदानावर सभा होणार असून राज ठाकरे कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करतात याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे. राज ठाकरे यांच्या सभेनंतर दुसर्‍या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची सभा होत असल्याने राज ठाकरे जहरी शब्दात टीका करतात की, नरमाईची भूमिका घेतात याविषयीची उलट-सुलट चर्चा शहरात सुरू आहे.

लोकसभा निवडणुकींच्या प्रचाराला आता अवघे दोन दिवस उरले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंपाठोपाठ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या सभांनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच गेल्या अनेक महिन्यामध्ये राज ठाकरे यांची शहरात जाहीर सभा झालेली नाही. अलीकडील राज ठाकरे यांच्या सभा राज्यभर गाजत आहेत. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे उद्याच्या सभेत काय बोलतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या