19 July 2019 9:45 AM
अँप डाउनलोड

पालघर लोकसभा: बहुजन विकास आघाडीच्या जाहिरातीत विकासाच्या मुद्यांवर भर

पालघर लोकसभा: बहुजन विकास आघाडीच्या जाहिरातीत विकासाच्या मुद्यांवर भर

पालघर : पालघर लोकसभा मतदारसंघात सध्या प्रचाराचे केवळ २ दिवस शिल्लक राहिले आहेत. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्वात मोठा फटका बहुजन विकास आघाडीला बसला तो आयत्यावेळी विरोधकांनी पक्ष चिन्हावरून केलेलं राजकारण असंच म्हणावं लागेल. मात्र संपूर्ण पट्ट्यात कार्यकर्त्यांचं उत्तम जाळं असल्याने त्याचा फारसा परिणाम होणार नाही असं प्रथम दर्शनी दिसत आहे.

या सर्व प्रचाराच्या धामधुमीत सर्वात महत्वाचा घटक म्हणजे नव्याने मिळालेलं पक्ष चिन्हं म्हणजे ‘ऑटो-रिक्षा’ सामान्य मतदारांपर्यंत अगदी कमी कालावधीत पोहोचवणे हेच होतं. मात्र संबंधित जवाबदारी उचलली असावी ती उत्तुंग हितेंद्र ठाकूर यांनी असंच म्हणावं लागेल. कारण बीएमएम’मध्ये जाहिरात क्षेत्रातील शिक्षण घेण्यासोबतच न्यूयॉर्क फिल्म अकॅडेमीमधून फिल्ममेकिंग असं पुढच शिक्षण देखील त्यांनी पूर्ण केलं आहे. अर्थात त्याच अनुभवाचा फायदा आज ते बहुजन विकास आघाडीच्या जाहिरातीत करताना दिसत आहेत.

त्यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरून सर्व जाहिरातींचा जोरदार प्रचार सुरु केला. आपल्या शिक्षण आणि कल्पकतेचा वापर करताना त्यांनी जाहिरातीत सर्वाधिक भर हा पालघर जिल्ह्याच्या सर्वागीण विकासावर दिल्याचं दिसत आहे. सामान्य मतदाराच्या दैनंदिन मूलभूत गरजा ओळखून, त्यांनी संबंधित जाहिराती बनविण्यावर भर दिल्याचं सहज नजरेस पडतं. त्यामुळे प्रत्यक्ष फुलटाईम राजकारणात नसलेले उत्तुंग हितेंद्र ठाकूर त्यांच्या शिक्षण आणि जाहिरात क्षेत्रातील अनुभवाचा फायदा बहुजन विकास आघाडीला कसा होईल याची जाहिरातीत काळजी घेताना दिसत आहेत.

काय आहेत त्या विकासाच्या मुद्यावरील निरनिराळ्या जाहिराती?

मराठी विवाह II अनुरूप मराठी वधू - वर मोफत ऑनलाईन नोंदणी

हॅशटॅग्स

#Hitendra Thakur(2)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या