13 December 2024 2:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Mutual Fund SIP | SIP चे 'हे' योग्य नियम पाळा आणि बंपर परतावा मिळवा, अशा पद्धतीने नियोजन करा फायदा होईल EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम IPO GMP | स्वस्त IPO येतोय रे, शेअर प्राईस बँड 35 रुपये, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, GMP संकेत - GMP IPO Horoscope Today | काही वेळातच 'या' राशींना मिळणार आनंदाची बातमी; जीवनात नवीन संधी प्राप्त होतील तर, काहींना पैसा HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, फायदा घ्या - NSE: RELIANCE
x

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती - अनिल परब

Transport Minister Anil Parab, ST Mahamandal Bus, Employees

मुंबई, २० जुलै : कोरोनाच्या काळात पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर एसटीच्या साडेचार हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा आली असल्याचे बातमी समोर आली होती. मात्र, यावर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी खुलासा केला आहे. कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देण्यात आल्याचं त्यांनी ट्विटरद्वारे सांगितलं.

परिवहन मंत्री अनिल परब यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. “करोनाच्या पार्श्वभूमीवर एसटीची सेवा अत्यल्प प्रमाणात सुरू असल्यामुळे कर्मचाऱ्याच्या नियुक्ती प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. येत्या काळात गरजेनुसार सदरच्या नियुक्त्या पुन्हा करण्यात येतील. यासंबंधी मीडियातून फिरत असलेल्या बातम्या चुकीच्या असून, कोणत्याही कर्मचाऱ्याला सेवेतून कमी करण्यात आलेले नाही,” अशी माहिती अनिल परब यांनी दिली आहे.

दरम्यान, केंद्र आणि राज्य सरकारच्या नियमानुसार चाकरमान्यांना कोकणात सुखरूप पाठवणार आणि परत आणणार असल्याचे आश्वासन आमदार अनिल परब यांनी दिलंय. त्यामुळे प्रवास कसा करायचा असा प्रश्न पडलेल्या चाकरमान्यांना कोकणात एसटीनं प्रवास करता येणार आहे. असं असलं तरी त्यासाठी काही नियमावलीचं पालन देखील करावं लागणार आहे अशी माहिती यापूर्वी अनिल परब यांनी दिली होती.

 

News English Summary: Transport Minister Anil Parab has tweeted in this regard. “The staff recruitment process has been temporarily suspended due to the low level of ST services in Corona. These appointments will be repeated in the near future.

News English Title: Transport Minister Of Maharashtra Anil Parab clarification on ST Mahamandal Bus employees appointment News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x