26 April 2024 4:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

भाजपच्या बेकारांकडे सध्या खिजवणे, चिडवणे, टिंगलटवाळी एवढेच काम: अनिल परब

BJP MLA Ashish Shelar, Minister Anil Parab

मुंबई: सध्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना नेत्यांमध्ये मुंबईतील नाईटलाईफ’वरून जोरदार टीका टिकण्या सुरु झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यात भारतीय जनता पक्षातील नेत्यांनी थेट पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना लक्ष केल्याने शिवसेनेतील नेते मंडळी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यात भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार सर्वात अग्रणी असल्याने परिवहन मंत्री अनिल मंत्री एकूणच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर बोचरी टीका केली आहे.

आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना बालहट्ट नावाने अनेक टिपण्या केल्या असून त्यात त्यांनी नाईट लाईफच्या निर्णयावर सडकून टीका केल्याचं पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी या निर्णयाचा निषेध करत भविष्याबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहेत. त्यात सध्या सामान्य मुंबईकरांकडून या निर्णयाला प्रतिसाद मिळताना दिसत नाही.

दरम्यान आमदार आशीष शेलार यांच्या टीकेला प्रतिउत्तर देताना परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले की, आशिष शेलार यांना सध्या काही काम नाही. संपूर्ण भारतीय जनता पक्ष बेकार आहे. त्यामुळे खिजवणे, चिडवणे, टिंगलटवाळी करणे एवढेच काम त्यांना शिल्लक राहिले आहे, अशी बोचरी टीका त्यांनी केली. ज्या गोष्टी समजत नाहीत त्यावर त्यांनी बोलू नये, असा सल्ला देखील अनिल परब यांनी शेलार यांना दिला आहे.

शरद पवार हेच आपले गुरू असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मान्य केले आहे. मग मोदी बोलतात ते शरद पवार यांच्या मनातील बोलतायत का, हे त्यांनी स्पष्ट करावे. शेलारांच्या विस्तवात ताकदच नाही की ज्याने आग पेटेल, असा जोरदार टोलाही परब यांनी यावेळी लगावला. कोरेगाव भीमाप्रश्नी कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याने त्याविषयी वक्तव्य करणे योग्य ठरणार नाही, असेही परब म्हणाले.

 

Web Title:  Minister Anil Parab criticized BJP MLA Ashish Shelar over current politics.

हॅशटॅग्स

#Ashish Shelar(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x