15 May 2021 11:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
आपला शत्रू एक बहुरूपी आहे, तो कपडे बदलून फोटो काढत असतो - सुरेंद्र राजपूत ऑक्सिजन गळती दुर्घटनेच्या १० दिवसांनी नाशिकमध्ये प्रकटलेले, पण चंद्रकांतदादा म्हणाले फडणवीस आणि मी.... कोणत्या फेक न्यूज फॉलो करते ही? | म्हणाली, समजलं की ते गंगा नदीतील नाही तर नाजयेरियातील फोटो राजकीय विरोधकांचा 'छळ' ही एकमेव 'टूलकिट' मोदी, शहा आणि आदित्यनाथ वापरतात - काँग्रेस राज्याला अधिक मदत द्या असं फडणवीसांकडून मोदींना एकही पत्र नाही, पण सोनिया गांधींना पत्र लिहिण्यास वेळ काढला फडणवीसजी सरकार लोकांचे जीव वाचविण्यात व्यस्त, तुम्ही भाजपची माशा मारण्याची स्पर्धा भरवत बसा - राष्ट्रवादी ज्याचं अग्नी दहन व्हायला हवं होतं, त्यांना दफन केलं जातंय, तुम्ही कसले हिंदू रक्षक - काँग्रेस
x

भाजपा खा. राजीव चंद्रशेखर रिपब्लिक'मध्ये भागीदार होते | म्हणून फडणवीसांनी ते प्रकरण दाबलं - काँग्रेस

BJP MP Rajeev Chandrashekhar, Republic TV, Devendra Fadnavis, Anvay Naik suicide case

मुंबई, १३ नोव्हेंबर : अन्वय नाईक आणि ठाकरे कुटुंबीयांमध्ये झालेल्या जमीन व्यवहारावरून भारतीय जनता पक्षातील नेते अर्णब गोस्वामींना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. मात्र आता भाजप नेत्यांचे अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टीव्हीसोबत असलेले कनेक्शन्स समोर येण्यास सुरुवात झाली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

अर्णब गीस्वामी यांनी २०१७ मध्ये रिपब्लिक टीव्हीची स्थापना केली होती. त्यामध्ये राजीव चंद्रशेखर यांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत स्वतःकडे मोठा हिस्सा घेतला होता. मात्र ३ एप्रिल २०१८ रोजी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपकडून राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतली होती. त्याबाबत त्यांनी स्वतः ट्विट केलं होतं.

तत्पूर्वी राजीव चंद्रशेखर यांनी भाजपामध्ये रुजू झाल्यामुळे आणि भाजप खासदार म्हणून निवडून आल्याने त्यांच्या मालकीचे रिपब्लिक टीव्हीचे बरेचसे शेअर्स अर्णब गोस्वामी यांना बायबॅक करण्यास सांगितले होते आणि त्यानंतर त्यांची एशियानेट न्यूज मीडिया अँड एंटरटेनमेंट रिपब्लिक टीव्हीमधील अल्प भागीदार झाली. त्यामुळे भारतीय जनता पक्षातील नेते अर्णब गोस्वामी यांना का वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत याचा प्रत्यय येण्यास सुरुवात होईल असं म्हटलं जातंय.

अर्णव गोस्वामी यांच्या रिपब्लिक चॅनेलमध्ये भाजपचे खासदार राजीव चंद्रशेखर हे भागीदार होते. गोस्वामी हे भाजपसाठी काम करतात म्हणूनच देवेंद्र फडणवीस सरकारनं अन्वय नाईक यांचं आत्महत्या प्रकरण दाबलं,’ असा घणाघाती आरोप महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

 

News English Summary: BJP MP Rajiv Chandrasekhar was a partner in Arnav Goswami’s Republic Channel. That is why Goswami works for BJP, that’s why the Devendra Fadnavis government suppressed Naik’s suicide case, ‘said Maharashtra Congress spokesperson Sachin Sawant.

News English Title: BJP MP Rajeev Chandrashekhar was in Republic TV reason Fadnavis govt close the file of Anvay Naik suicide case news updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(603)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x