21 October 2019 4:15 PM
अँप डाउनलोड

विदर्भ - मराठवाड्यात गारपिटीनं शेतकऱ्यांचं स्वप्न गोठलं : बळीराजा हतबल

मुंबई : विदर्भ – मराठवाड्याला तुफान गारपिटीचा तडाखा आणि अनेक जिल्ह्यांत उभं पीक गारपिटीन हिरावून घेतलं. निसर्गाच्या ह्या घाल्याने बळीराजा हतबल झाला आहे.

मराठवाड्यातील गारपिटीचा तडाखा सर्वाधिक जालना, परभणी आणि बीड या जिल्ह्यांना बसला असून, निसर्गाच्या या थैमानाने बळीराजा अक्षरशा हतबल होऊन रडकुंडीला आला आहे.

जागोजागी गारांचा ढीग पाहायला मिळत आहेत. जालनातील काही भागाला तर काश्मीरचे स्वरूप आल्याचे पाहावयाला दिसत आहे. पडणाऱ्या गारांचे आकार मोठे असल्याने उभी पिकं अक्षरशा झोपली आहेत आणि निसर्गाने शेतकऱ्याचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. सरकारने ने पाहणी करण्याचे आदेश दिले असून सर्वाधिक नुकसान हे ज्वारी, गहू, द्राक्ष आणि हरभऱ्याचे झाल्याचे समजते आहे.

हॅशटॅग्स

#hailstorm(1)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या