4 August 2020 2:11 PM
अँप डाउनलोड

मराठयांच्या शौर्यामुळेच भारताचं आजच स्वरूप : देवेंद्र फडणवीस

मुंबई : मराठ्यांच्या आरक्षणाचा विषय हा महत्वाचा असून त्यावर सरकार कडून कार्यवाही सुध्दा सुरु आहे. सरकार त्यावर न्यायालयात सक्षमपणे आपले काम करत आहे असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा सन्मान सोहळ्यात उपस्थितांना संबोधताना केले.

BhagyaVivah Marathi Matrimonial

आरक्षणाबाबत मागील काही वर्षांपासून मराठा तरुण आणि तरुणींमध्ये प्रचंड अस्वस्थता होती आणि त्यामुळेच मराठ्यांचे अभूतपूर्व मोर्चे निघाले. मराठांची ते मोर्चे इतके विशाल होते की त्याची तुलना थेट महाभारतातील एक घटनेशी करताना मुख्यमंत्री म्हणाले की महाभारतात श्रीकृष्णाने जसे त्यांच्या विराट रूपाचे दर्शन दिल्यावर जशी संपूर्ण सृष्टी नतमस्तक झाली होती तसेच मराठा मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या विराट रूपाचे दर्शन सर्वांना झाले. आमचे संपूर्ण सरकार मराठा मोर्च्यापुढे नतमस्तक झाले होते आणि त्यामुळेच आम्ही विविध निर्णय मराठा समाजाच्या हितासाठी घेतले होते असे मुख्यमंत्री उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले.

आमचं सरकार न्यायालयात सक्षमपणे आपली जवाबदारी पार पाडत असून मराठा आरक्षण हा विषय आमच्यासाठी महत्वाचा आहे असेही फडणवीस म्हणाले. शिष्यवृत्ती दिल्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची दारे उघडली गेली ज्याचा लाखो तरुणांना प्रत्यक्ष फायदा होत आहे. अण्णाभाऊ साठे महामंडळ हे केवळ कागदावरच होते जे आमच्या सरकारने जिवंत केले असून त्याचा थेट फायदा मराठा तरुण घेत आहेत असे ही फडणवीस उपस्थितांना संबोधताना मम्हणाले.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x