15 December 2024 6:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या
x

4 खासदार असणारे लोकनेते | मग 303 खासदार असणाऱ्या मोदींच्या नेतृत्वला काय म्हणाल

BJP MLA Gopichand Padalkar, NCP President Sharad Pawar, Chandrakant Patil

सांगली, २३ नोव्हेंबर: भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केल्यामुळे वादंग निर्माण झाला आहे. तर ज्या पक्षाचे 4 खासदार आहे त्यांना लोकनेते म्हणताय मग 303 खासदार निवडून आणणाऱ्या मोदी यांच्या नेतृत्वाला काय म्हणायचे’ असा सवाल करत भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीला डिवचले आहे.

सांगलीमध्ये पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक प्रचारासाठी गोपीचंद पडळकर आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांसोबत बोलत असताना गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीला टोला लगावला आहे.

सांगलीमध्ये पुणे पदवीधर मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संग्राम देशमुख यांचा प्रचारासाठी मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्यात पडळकर प्रसार माध्यमांशी बोलत होते. ज्या पक्षाचे 4 खासदार निवडून येतात, त्यांना लोकनेता म्हणता, मग 303 खासदर निवडून देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना काय म्हणायचं, तुम्ही मोदींवर टीका करता, मग आम्ही तुमच्यावर टीका केली तर इतका त्रागा का करता, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केली आहे.

 

News English Summary: Bharatiya Janata Party state president Chandrakant Patil’s criticism of NCP president Sharad Pawar has created controversy. BJP MLA Gopichand Padalkar has slammed the NCP for questioning what to say to the leadership of Modi who has elected 303 MPs.

News English Title: BJP MLA Gopichand Padalkar criticized NCP President Sharad Pawar after targeting Chandrakant Patil News updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x