24 March 2023 5:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
ChatGPT Job Effect | चॅट जीपीटी'मुळे या क्षेत्रातील नोकऱ्यांना प्रचंड धोका, कोणत्या नोकऱ्या सुरक्षित? लिस्ट मध्ये तुमची नोकरी कोणती? Accenture Job Loss | आयटी क्षेत्रात भूकंप, दिग्गज कंपनी अ‍ॅक्सेन्चर 19,000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार OnePlus Nord CE 3 Lite 5G | वनप्लसचा 108 MP कॅमेरा असलेला स्वस्त Nord CE 3 Lite 5G स्मार्टफोन लाँच होणार, किंमत-फीचर्स? Hindenburg Report on Block Inc | अदानींनंतर हिंडनबर्गचा बॉम्ब या उद्योगपती फुटला, शेअर्स 20 टक्क्यांनी कोसळले Numerology Horoscope | 24 मार्च, तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Deep Industries Share Price | या शेअरने 552 टक्के परतावा दिला, आता स्टॉक स्प्लिटची घोषणा, स्टॉक स्प्लिटचा फायदा घ्या Sera Investment Share Price | लॉटरीच लागली! गुंतवणुकदारांना 454 टक्के परतावा दिल्यानंतर आता हा शेअर स्प्लिट होतोय
x

कोरोनावरून परिस्थिती नियंत्रणाबाहेर जातेय | महाराष्ट्र, गुजरातसह ४ राज्यांकडून मागवला अहवाल

Supreme court, Covid report, Maharashtra, Delhi, Gujarat

नवी दिल्ली, २३ नोव्हेंबर: कोविड-१९ च्या (Covid-19) रुग्णांवर योग्य ते उपचार आणि रुग्णालयांमधील करोना रुग्णांच्या मृतदेहाशी सन्मानजनक व्यवहार या मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयात आज सोमवारी सुनावणी झाली. या वेळी सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतल करोना संसर्गाच्या स्थितीवर चिंता व्यक्त केली. दिल्लीत परिस्थिती वाईट झाल्याचे निरीक्षण न्यायमूर्ती अशोक भूषण यांनी नोंदवले. तसेच, करोना रुग्णांचे व्यवस्थापन, सोई सुविधा इत्यांदीबाबतची स्थिती स्पष्ट करणारा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने मागवला आहे. अशा परिस्थितीत रुग्णालयांची स्थिती काय आहे हा मुख्य मुद्दा असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

कोरोना रुग्णांवरील उपचार व मृत्यू मृतदेहांच्या हाताळणीसंदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती आर.एस. रेड्डी व एम. आर. शाह यांचा समावेश असलेल्या खंठपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयानं दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात आणि आसाम या राज्यातील कोरोना परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. चार राज्यांमध्ये संसर्गामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर चालली असून, राज्यांनी दोन दिवसांत अहवाल सादर करावा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

 

News English Summary: A petition was filed in the Supreme Court regarding treatment and handling of death corpses on Corona patients. The petition was presided over by Justice Ashok Bhushan. Reddy and M. R. The hearing was held before a bench comprising Shah. The court also expressed concern over the Corona situation in Delhi, Maharashtra, Gujarat and Assam. In four states, the situation is out of control due to the infection and the states have been directed to submit their reports within two days, the court said.

News English Title: Supreme court of India seeks Covid report from Maharashtra Delhi Gujrat Assam News Updates.

हॅशटॅग्स

#Supreme Court(136)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x