15 December 2024 11:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा
x

पालघर प्रकरणी अटक केलेल्यांमध्ये एकही मुस्लिम नाही: गृहमंत्री अनिल देशमुख

Anil Deshmukh, Palghar Mob Lynching

पालघर, २२ एप्रिल: पालघरमध्ये चोरीच्या संशयावरुन दोन साधू आणि त्यांच्या गाडी चालकाची जमावाने निर्घृणपणे हत्या केली होती. या घटनेप्रकरणी आतापर्यंत १०१ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यापैंकी एकही जण मुस्लिम नाही, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. गृहमंत्र्यांनी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला यावेळी त्यांनी हे सांगतिले.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज ट्विटर लाइव्हवरून जनतेशी संवाद साधत पालघर आणि वाधवान प्रकरणावर भाष्य केलं. पालघरमध्ये दोन साधूंची झालेली हत्या अत्यंत दुर्देवी आहे. अशा घटना घडायला नकोय. ही घटना घडल्यानंतर अवघ्या ८ तासांत पोलिसांनी १०१ जणांना ताब्यात घेतलं आहे. या १०१ आरोपींमध्ये एकाही मुस्लिम व्यक्तीचं नाव नाही. कोणत्याही मुस्लिम व्यक्तीचा या घटनेशी काही संबंध नाही. तरीही जातीचं राजकारण केलं जात आहे. या घटनेत न्याय व्हावा म्हणून आम्ही हे प्रकरण तात्काळ सीआयडीकडे दिलं आहे असं देखील स्पष्ट केलं.

या हत्याकांडातील तब्बल तीनशेहून अधिक आरोपी सध्या लगतच्या जंगलात लपून बसले असून या गावाच्या चारीही बाजुंनी घनदाट जंगल असल्याने आरोपींचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हानात्मक ठरत आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस ड्रोनची मदत घेत असून पोलिसांचा मोठा फौजफाटा गडचिंचले भागात दाखल झाला आहे.

दरम्यान, आज दुपारी २ वाजता वाधवान कुटुंबियांचा क्वारंटाईनचा कालावधी संपतोय. त्यांना ताब्यात घेण्याचे पत्र इंफोर्समेंट आणि सीबीआयला देण्यात आले आहे. सीबीआय त्यांना घेऊन जाईपर्यंत ते पोलीस खात्याच्या ताब्यात असतील. महाराष्ट्र शासन यांना कुठेही पळू देणार नसल्याचे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.

 

News English Summary: In Palghar, two monks and their driver were brutally murdered on suspicion of theft. So far, five people have been arrested by the police for this incident. None of those arrested is a Muslim, said state Home Minister Anil Deshmukh. He said this when the Home Minister interacted with the people through Facebook Live today.

News English Title: Maharashtra State home minister Anil Deshmukh says no muslim among those arrested in palghar mob lynching incident.

हॅशटॅग्स

#Palghar(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x