23 April 2025 5:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | शेअर प्राईस 90 रुपये; तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NHPC Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER Tata Technologies Share Price | टाटा तिथे नो घाटा, गुंतवणूकदारांकडून जोरदार खरेदी, मोठी संधी आली - NSE: TATATECH RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर घसरतोय, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला, गुंतवणूकदारांसाठी मोठी अपडेट - NSE: YESBANK NTPC Green Energy Share Price | पीएसयू शेअर देऊ शकतो मोठा परतावा, या कंपनीला मोठा भविष्यकाळ - NSE: NTPCGREEN
x

फेसबूक जिओमध्ये तब्बल ४३,५७४ कोटीची गुंतवणूक करणार

Facebook, Jio Platform

मुंबई, २२ एप्रिल: फेसबूककडून बुधवारी एक मोठी घोषणा करण्यात आली. रिलायन्स उद्योग समूहातील जिओचे १० टक्के समभाग खरेदी करण्याची घोषणा फेसबूककडून करण्यात आली. ५.७ अब्ज अमेरिकी डॉलर अर्थात ४३,५७४ कोटी रुपये फेसबूककडून जिओमध्ये गुंतविण्यात येणार आहेत. भारतातील सोशल मीडियामध्ये आपला परीघ आणखी विस्तारण्यासाठी फेसबूककडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

या गुंतवणुकीमुळे जिओ प्लॅटफॉर्म्सला मोठा फायदा होणार आहे. जिओ अँप प्लॅटफॉर्मचं मूल्य वाढून ४.६२ लाख कोटी रुपये होईल. या करारामुळे मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रिजवरील कर्ज आणखी कमी होईल आणि मार्क झुकरबर्ग यांच्या फेसबुकला एक मजबूत प्लॅटफॉर्म मिळेल. फेसबुक आणि जिओ विविध प्रोजक्टवर एकत्रितपणे काम करणार आहे, ज्यामुळे देशभरात व्यवसायाच्या संधी निर्माण होतील, असं दोन्ही कंपन्यांनी आपल्या वेगवेगळ्या जारी केलेल्या वक्तव्यांमध्ये म्हटलं आहे.

फेसबूककडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिओ लिमिटेडमध्ये ५.७ अब्ज डॉलरची गुंतवणूक करीत असल्याची घोषणा आम्ही आज करतो आहोत. जिओ ही रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची कंपनी आहे. या गुंतवणुकीनंतर फेसबूक ही या कंपनीतील सर्वात मोठी गुंतवणूक करणारी एक लहान गुंतवणूकदार झाली आहे. फेसबूकच्या गुंतवणुकीमुळे रिलायन्स जिओचे ९.९९ टक्के समभाग पूर्णपणे त्या कंपनीकडे जाणार आहेत, असे रिलायन्सकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे. रिलायन्स जिओचे देशात सध्या ३८.८ कोटी वापरकर्ते आहेत.

भविष्यात लवकरच जिओचा नवीन डिजीटल प्लॅटफॉर्म जिओ मार्ट आणि व्हाट्सअपकडून जवळपास ३ कोटी किराणा दुकानांमध्ये डिजीटल व्यवहार होईल. म्हणजेच तुम्ही दररोज लागणाऱ्या वस्तूंची डिलिव्हरी जवळच्या दुकानातून वेगाने मागवू शकता, असं अंबानी म्हणाले. डिजीटल तंत्रज्ञान वापरुन छोट्या किराणा दुकानदारांनाही त्यांचा उद्योग वाढवता येईल आणि यामुळे रोजगाराच्या संधी वाढतील, असंही ते म्हणाले. जिओ मार्ट आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून देशात आणखी रोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचं फेसबुकनेही म्हटलं आहे.

 

News English Summary: Facebook made a big announcement Wednesday. Facebook has announced the purchase of 10 per cent stake in Reliance Industries Group. Facebook will invest 7 5.7 billion, or Rs 43,574 crore, in Geo. The decision has been taken by Facebook to further expand its reach in social media in India.

News English Title: Story Facebook to buy 10 percent stake in Reliance Jio platforms for 43574 crore News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या