28 September 2020 9:10 PM
अँप डाउनलोड

सोयीचं राजकारण? नवाझ शरीफांना अलिंगन तो मास्टर-स्ट्रोक आणि राहुल गांधींच अलिंगन म्हणजे राजकारण?

नवी दिल्ली : राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना अलिंगन दिल्याच्या विषयाला अनुसरून ट्विटर द्वारे प्रतिक्रिया नोंदवली आहे. कारण त्या अलिंगनानंतर समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर होकारात्मक आणि नकारात्मक प्रतिक्रिया सर्वच थरातून नोंदवल्या जात आहेत. राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना आलिंगन दिल खरं, परंतु मोदींनी उभं राहण्याची तसदी घेतलेली पाहायला मिळाली नाही.

BhagyaVivah Marathi Matrimonial

नरेंद्र मोदी अनेक वेळा जगभरातील देशांच्या दौऱ्यावर गेले होते, तेव्हा त्यांनी त्या देशातील राष्ट्राध्यक्षांना खुल्या मानाने अलिंगन दिल होत आणि त्यात अगदी पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांचा सुद्धा समावेश होता. नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला सरप्राईज भेट देऊन थेट पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या वाढदिवसाला हजेरी लावली होती. अगदी नवाझ शरीफांना खुल्या मनाने अलिंगन देऊन फोटोसेशन सुद्धा करण्यात आलं होत. विशेष म्हणजे मोदींच्या त्या पाकिस्तान भेटीनंतर पाकिस्तानच्या कुरापत्या अधिक वाढल्या होत्या. परंतु त्या पाकिस्तान भेटीला नरेंद्र मोदींची राजकीय मुसद्देगिरी आणि मास्टरस्ट्रोक अशी बोंबाबोंब करण्यात आली होती जे सर्वश्रुत आहे.

जर विषय राजकीय प्रगल्भता आणि राजकीय मुसद्देगिरीचाच असेल, ज्याचं जागतिक प्रदर्शन थेट पाकिस्तानमध्ये मोठ्या मणाने अलिंगन आणि केक खाऊन व्यक्त करण्यात आलं आणि ज्याचं राजकीय विश्लेषण मोदींचा मास्टरस्ट्रोक आणि राजकीय मुसद्देगिरी असं केलं गेल होत. मग भारतातीय लोकतंत्राच प्रतीक असलेल्या संसदेत जेव्हा भारतातील विरोधी पक्षाचा अध्यक्ष भारताच्याच पंतप्रधानाला भारतातच अलिंगन देतो तेव्हा त्यात राजकारण शोधण्याचा प्रयत्न का केला जात आहे, जो पाकिस्तान भेटीत केला गेला नाही? अर्थात, प्रत्येक विषय हा सत्ताधाऱ्यांच्या सोयीनुसार मांडला आणि पहिला जात आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1321)#Rahul Gandhi(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x