15 December 2024 10:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

अमेरिकेतील वृत्तपत्रामध्ये दिल्लीच्या शिक्षण मॉडेलचे कौतुक, दुसरीकडे दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सीबीआय छापे

Sisodia on NYT front page

Delhi Education Model in NYT | केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानी छापे टाकण्यास सुरुवात केल्यानंतर काही वेळातच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरवरून ‘जग दिल्लीच्या शिक्षण आणि आरोग्य मॉडेलबद्दल बोलत आहे’, म्हणून ही कारवाई केली जात असल्याचा आरोप केला. केजरीवाल यांनी न्यूयॉर्क टाइम्सच्या (एनवायटी) पहिल्या पानाचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे, ज्यात दिल्लीतील एका शाळेचा आणि सिसोदियायांचा फोटो आहे., ज्यात त्यांनी म्हटले होते की , ‘आमची मुले आमच्यासाठी मौल्यवान आहेत’.

ज्या दिवशी अमेरिकेतील सर्वात मोठ्या वृत्तपत्राने दिल्लीच्या शिक्षण मॉडेलचे कौतुक केले आणि मनीष सिसोदिया यांचे छायाचित्र छापले, त्या दिवशी केंद्राने सीबीआयला मनीषच्या निवासस्थानी पाठवले. सीबीआयचे स्वागत आहे. आम्ही सहकार्य करू. यापूर्वीही छापे टाकण्यात आले होते. काहीही निष्पन्न झालं नाही. आताही (sic) काहीही बाहेर येणार नाही,” असे केजरीवाल यांनी हिंदीत केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

मनिष सिसोदिया सीबीआयच्या कारवाईवर काय म्हणाले :
मनिष सिसोदिया यांनी ट्विट करून सीबीआय कारवाईची माहिती दिली. “सीबीआय आलीये. त्यांचं स्वागत आहे. आम्ही प्रामाणिक आहोत. लाखो मुलांचं भविष्य घडवत आहोत. हे अत्यंत दुर्दैवी आहे की, आपल्या देशात जो चांगलं काम करतो, त्याला अशा पद्धतीने त्रास दिला जातो. त्यामुळेच आपला देश अजूनपर्यंत पहिल्या क्रमांकावर गेला नाहीये.

तपासात पूर्ण सहकार्य करणार आहे, जेणेकरून सत्य लवकर समोर यावं. आतापर्यंत माझ्यावर अनेक गुन्हे दाखल केले, पण काहीच हाती लागलं नाही. यातही काहीच हाती लागणार नाही. देशात चांगलं शिक्षण मिळावं म्हणून सुरू असलेलं माझं काम रोखू शकत नाही”, असं सिसोदिया यांनी म्हटलंय.

दिल्लीतील शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात सुरू असलेलं चांगलं काम बघून हे त्रस्त आहेत. त्यामुळेच दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन आणि शिक्षणमंत्र्यांना पकडलं आहे, जेणेकरून शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील काम थांबवता येईल. आम्हा दोघांवरही खोटे आरोप केले जात आहेत. न्यायालयात सत्य समोर येईल”, असं मनिष सिसोदिया यांनी म्हटलंय.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Sisodia on NYT front page CBI at his residence check details 19 August 2022.

हॅशटॅग्स

#Sisodia on NYT front page(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x