27 July 2024 10:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा HFCL Share Price | 5G संबंधित HFCL सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा HUDCO Share Price | मल्टिबॅगर शेअरसाठी BUY रेटिंग, कंपनीबाबत अपडेट आली, यापूर्वी 400% परतावा दिला
x

नवाब मलिक सत्य ठरले, फर्जीवाडा उघड! बेहिशीबी मालमत्ता प्रकरणी समीर वानखेडे यांच्या घरावर CBI चा छापा, भ्रष्टाचारावरून गुन्हा दाखल

Sameer Wankhede

Sameer Wankhede | मुंबईतून मोठी बातमी समोर येत आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे माजी प्रमुख समीर वानखेडे यांचा पाय आता अधिक खोलात गेला आहे. कारण केंद्रीय अन्वेषण विभागाने समीर वानखेडेंविरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. एवढंच नव्हे तर सीबीआयने त्यांच्या मुंबईतील घराचीही झडतीही घेतली आहे.

2021 मध्ये समीर वानखेडे हे ड्रग्स प्रकरणामुळे चर्चेत आले होते. शाहरुख खानचा मुलगा आर्यन याला समीर वानखेडे यांनीच ड्रग्स प्रकरणात अटक केली होती. मात्र, नंतर आर्यन खानला क्लीन चिट देण्यात आली होती. या सगळ्या मुद्द्यावरुन माजी मंत्री नवाब मलिक यांनी सर्वात आधी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

एनसीबी मुंबई झोनलचे माजी डायरेक्ट समीर वानखेडे यांच्या घरावर सीबीआयने छापा टाकल्याची मोठी बातमी समोर आली आहे. बेहिशीबी मालमत्ता प्रकरणी सीबीआयने ही कारवाई केली आहे. एनसीबीच्या रिपोर्टनंतर सीबीआयकडून ही कारवाई केली जात आहे. सीबीआयने समीर वानखेडे यांच्या भ्रष्टाचारावरून त्यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळत आहे.

विशेष म्हणजे सीबीआयने जो गुन्हा दाखल केलाय त्या अनुषंगाने वेगळी काही कारवाई केली जाते का ते पाहणं देखील महत्त्त्वाचं ठरणार आहे. मात्र, सीबीआयने भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केलाय. त्याच गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांच्या घरावर छापा टाकण्यात आला आहे.

समीर वानखेडे यांच्या विरोधात चौकशी करण्यासाठी एक टीम तैनात करण्यात आली होती. ही टीम सविस्तर तपास करत होती. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचं क्रूझ ड्रग्स प्रकरण, माजी मंत्री नवाब मलिक यांच्या जावायाचं प्रकरण आणि आणखी असे काही प्रकरणं होती. त्या प्रकरणांप्रकरणी टीमकडून चौकशी करण्यात आली. या टीमने समीर वानखेडे यांच्या बेहिशेबी मालमत्तेचा अहवाल तयार केला होता. हा अहवाल एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आला होता. अखेर या प्रकरणी सीबीआयकडून कारवाई केली जात आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Mumbai CBI raid on former NCB zonal director Sameer Wankhede check details on 12 May 2023.

हॅशटॅग्स

#Sameer Wankhede(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x