15 December 2024 5:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये
x

नरेंद्र मोदींनी जाहीर केलं २० लाख कोटींचं आर्थिक पॅकेज

PM Narendra Modi, Lockdown

नवी दिल्ली, १२ मे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वावलंबी भारत अभियानाची घोषणा केली असून २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेशी आज संवाद साधला. यावेळी त्यांनी या पॅकेजची घोषणा केली. नरेंद्र मोदींनी सांगितलं की, “हे पॅकेज स्वावलंबी भारत अभियानाचा महत्त्वाचा भाग आहे. आतापर्यंत जाहीर करण्यात आलेली आर्थिक मदत आणि हे पॅकेज एकत्र मिळून २० लाख कोटींचं आहे. २०२० मध्ये जाहीर करण्यात आलेलं हे २० कोटींचं पॅकेज स्वावलंबी योजनेला नवी गती देईल”. हे पॅकेज जीडीपीच्या १० टक्के असल्याचंही नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं.

भारत जेव्हा स्वावलंबी होण्याची गोष्ट करतो, तेव्हा त्याची वकीली करत नाही. जी संस्कृती जगाचा विकास करू इच्छिते. जगाला घर मानते. भारताच्या कामाचा प्रभाव जगाच्या कल्याणावर पडतो. टीबी असेल, हागणदारी मुक्ती असेल जगावर त्याचा परिणाम झाला आहे. तणावातून मुक्ती देण्यासाठी भारताकडून जगाला भेट मिळाली आहे. जगाला विश्वास वाटू लागला आहे, भारत काही चांगले करू शकतो. पण प्रश्न आहे कसा? यावर उत्तर आहे १३५ कोटी लोकांनी केलेला स्वावलंबीपणाचा संकल्प यावर उत्तर आहे, असे मोदी म्हणाले.

तसेच कोरोना व्हायरस हा दीर्घकाळ आपल्यासोबत राहणार आहे. मात्र, आपल्याला कोरोनाशी लढण्यातच गुंतून राहता येणार नाही. त्यासाठी आपण लॉकडाऊनचा चौथा टप्पा हा अत्यंत नव्या स्वरुपाचा आणि नियमांचा असेल. राज्यांकडून मिळणाऱ्या सूचनांच्या आधारे याची आखणी केली जाईल आणि १८ मे पूर्वी नागरिकांना याबाबत सूचित केले जाईल, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

पुढे मोदी म्हणाले, “कोरोनापूर्वीचं जग समजून घ्यायची संधी आपल्याला मिळाली आहे. २१ वं शतक भारताचं असेल हे आपलं स्वप्न नाही, तर जबाबदारी आहे. पण याचा मार्ग काय? जगातली आजची स्थिती आपल्याला शिकवते आहे, सांगते आहे एकच मार्ग – स्वयंपूर्ण भारत. आपल्याकडे शास्त्रांत सांगितलेला हा एकच रस्ता आहे – आत्मनिर्भर भारत. संकटात संधी शोधायला हवी.” उदाहरण देताना त्यांनी सांगितलं, “कोरोना संकटाच्या आधी एकही PPE किट बनत नव्हती. N-९५ मास्कचं उत्पादन अगदी कमी होतं. आता स्थिती आहे, की भारतात दररोज 2 लाख PPE किट आणि मास्कचं उत्पादन होत आहे.”

“भारताच्या प्रगतीमध्ये नेहमी वैश्विक प्रगती समाविष्ट आहे. भारताच्या कृतीचा प्रभाव वैश्विक कल्याणाकडेच असतो. ग्लोबल वॉर्मिंग, तणावमुक्ती यासाठी भारताने जगाला भेट दिली आहे. जगण्या-मरण्याच्या या जागतिक लढाईत आता भारताची औषधं कामास येत आहे. भारताची जगभर प्रशंसा होते, तेव्हा ती अभिमानाची गोष्ट असते.”

 

News English Summary: Prime Minister Narendra Modi has announced the Swavalambi Bharat Abhiyan and an economic package of Rs 20 lakh crore. Narendra Modi interacted with the people of the country today. This time he announced the package.

News English Title: Corona virus Lockdown Prime Minister Narendra Modi Announce Economic Package Of 20 Lakh Crore News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x