24 May 2024 1:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 24 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BHEL Share Price | एका वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे चार पटीने वाढले, BHEL स्टॉक Hold करावा की Sell? IRFC Share Price | IRFC शेअर अप्पर सर्किट हिट करतोय, आता तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, यापूर्वी 452% परतावा दिला IPO GMP | संधी सोडू नका! हा IPO स्टॉक ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ घालतोय, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल Tata Motors Share Price | टाटा ग्रुपचे 5 शेअर्स मालामाल करत आहेत, मिळतोय 1647 टक्केपर्यंत परतावा RVNL Share Price | RVNL स्टॉक बुलेट तेजीने परतावा देणार, स्टॉक चार्टनुसार 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, खरेदीचा सल्ला BEML Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, मागील 4 दिवसांत दिला 25% परतावा, वेळीच फायदा घ्या
x

स्वदेशी अर्जुन रणगाडा | तत्कालीन संरक्षण मंत्री शरद पवार | आणि भाजप नेत्यांचं अज्ञान

India's Atmanirbhar Bharat, Arjun Tank, BJP Marketing

मुंबई, १६ फेब्रुवारी: देशाच्या संरक्षण क्षेत्राला आत्मनिर्भर बनविण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांना यश मिळत आहे. कालच पंतप्रधान मोदी यांनी चेन्नईमध्ये स्वदेशी बनावटीचा हायटेक अर्जुन रणगाडा लष्कराला सुपूर्द केल्यामुळे देशाची संरक्षण व्यवस्था अधिक बळकट व सक्षम झाली आहे.

यामुळे सातत्याने देशाच्या संरक्षण मंत्रालयाबद्दल अपप्रचार करणारे कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि कॉंग्रेसचा खोटारडेपणा आता उघड झाला आहे असं चंद्रकांत दादा म्हणाले. अर्जुन एम के 1 ए हा लढाऊ रणगाडा संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या (DRDO) लढाऊ वाहने संशोधन व विकास आस्थापनेने उत्पादित केला आहे. या लढाऊ रणगाड्याला हंटर किलर रणगाडा असेही म्हटले जाते असे सांगतानाच पाटील म्हणाले की, देशाचा संरक्षण विभाग सक्षम असतानाही राहुल गांधी मात्र वारंवार संरक्षण विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत असून विनाकारण अपप्रचार करीत आहेत. त्यांची ही वक्तव्ये म्हणजे देशाच्या संरक्षण खात्याला हेतुपुरस्सरपणे बदनाम करण्याचा प्रकार असून तो निंदनीय असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

आज मोदींसहित देश आणि राज्य पातळीवरील नेते आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत स्वतःचा प्रचार करून घेत आहेत. तोच कित्ता राज्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांना लक्ष करताना गिरवला आहे. त्याला कारण ठरला आहे मोदींच्या हस्ते लष्कराला सुपूर्द करण्यात आलेला अर्जुन रणगाडा. भाजपचे नेते आत्मनिर्भर भारत अभियानावरून प्रचार करत असले तरी त्यांना देशाच्या संरक्षण व्यवस्थेबाबत किती ज्ञान आहे त्याचा प्रत्यय येऊ शकतो आणि तो देखील सध्याच्या अर्जुन रणगाड्यावरून असंच सिद्ध होतंय.

राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी संरक्षण मंत्री, माजी कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला २०१७ मध्ये तब्बल ५५ वर्षे झाली. तत्कालीन संरक्षणमंत्री शरद पवार (कार्यकाळ १९९१-९३) यांच्या म्हणण्यानुसार, ऑक्टोबर १९९१ पर्यंत अर्जुन एमबीटीचे १२ विकसित प्रगत प्रोटोटाइप शेवटच्या टप्यात होते. त्यावेळी १९९५ पर्यंत उत्पादन करून अर्जुन रणगाडा सेवेत रुजू होईल असा अंदाज वर्तविण्यात आला होता. मारक क्षमता आणि रणनीतिक चाचणीची लक्ष पूर्णपणे प्राप्त करण्याचे प्रयत्न वैज्ञानिकांकडून सुरु होते. त्यावेळी भारत मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यास सक्षम असल्याचं म्हटलं होतं. मात्र त्यानंतर पाकिस्तानने युक्रेनबरोबर टी-84s रणगाडे खरेदी करण्याचा करार जाहीर केला आणि त्यामुळे भारताला अर्जुन रणगाड्यांची गरज निश्चित झाली होती.

त्यानंतर 9 जानेवारी 1996 रोजी भारताकडून अर्जुनचे औपचारिक अनावरण केले गेले आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याचं लक्ष समोर ठेवण्यात आलं होतं. तत्कालीन संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी भारतीय अर्जुन रणगाड्याची तुलना अमेरिकेच्या एम 1 ए 2 अब्राम, जर्मनीच्या लेपर्ड 2 आणि फ्रांसच्या लेक्लार्कशी तुलना केली होती.

अमेरिकेच्या फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्ट (FAS) वर अर्जुन रणगाड्याच्या सुरुवातीपासूनच्या संशोधनापासूनची सविस्तर माहिती देण्यात आली आहे (येथे वाचू शकता). त्या डॉक्युमेंट्स’मध्ये देखील तत्कालीन संरक्षण मंत्री शरद पवार यांचा अगदी पहिल्या पानापासून स्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळे सध्या गवगवा आणि मार्केटिंग करणारे चंद्रकांत पाटील यांना हे ज्ञात करून दिल्यास आणि त्यांचा जळफळाट झाल्यास आश्चर्य वाटणार नाही. कारण आत्मनिर्भर भारत आणि भारतीय लष्कर या भावनिक विषयावर मार्केटिंग करून भाजप तरुणांच्या मनात धूळफेक करून पूर्व इतिहास तरुणाईपासून लपवत असल्याचं दिसतंय.

 

News English Summary: The American Federation of American Scientists (FAS) provides detailed information from the early research of Arjun’s chariot (read here). Even in those documents, the then Defense Minister Sharad Pawar is clearly mentioned from the very first page. So, it would not be a surprise if Chandrakant Patil, who is currently doing Gavagwa and marketing, is made aware of this and he gets fired. Because by marketing on the emotional issue of self-reliant India and Indian Army, BJP seems to be hiding the past history from the youth by throwing dust in the minds of the youth.

News English Title: India’s Atmanirbhar Bharat Arjun Tank marketing of BJP leaders news updates.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x