15 December 2024 11:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

मोदींची आर्थिक धोरणं चुकल्याने २०११ मधील जगात ३ऱ्या क्रमांकावरील अर्थव्यवस्था ६व्या क्रमांकावर

Narendra Modi, Manmohan Singh

नवी दिल्ली : सध्या देशभर आणि समाज माध्यमांवर एकच चर्चा रंगली आहे आणि ती म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था मोदींच्या नैत्रुत्वात मोठ्या झपाट्याने वाढत आहे. दुसरी महत्वाची गंभीर गोष्ट म्हणजे जवाबदार प्रसार माध्यमं देखील कोणताही मागचा पुढचा विचार न करता वाचकाकडे तेच खाद्य पोहोचवून २०२४मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने “मोदी मृगजळ” निर्माण करत आहे का अशी शंका निर्माण झाली आहे. वास्तविक सामान्य वाचकाला अर्थव्यवस्था आणि त्यात होणारे बदल याबद्दल सखोल असं काही कळत नसतं आणि ते मोजण्याची नेमकी परिमाणं काय असतात याची देखील त्यांना जास्त माहिती नसते. नेमका त्याच विषयाचा धागा पकडून सध्या मोदींच्या नैतृत्त्वात भारतीय अर्थव्यवस्था इंग्लंड नंतर जापानच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकेल अशा बातम्या जोरदारपणे पेरताना दिसत आहे.

एखाद्या देशाची अर्थव्यवस्था वर जाते किंवा खाली येते त्याला त्या देशातील सरकारची आर्थिक धोरणं सर्वाधिक जवाबदार असतात. परंतु वाचकापर्यंत अशा बातम्या पोहोचवताना प्रसार माध्यमं खरंच वास्तव समजून घेऊन ते वाचकापर्यंत पोहोचवतात का? असा गंभीर प्रश्न उपस्थित होतो आहे. कारण वाचकाच्या अज्ञानाचा फायदा सद्याचे सत्ताधारी देखील घेत आहेत आणि जवाबदार प्रसार माध्यमं देखील सत्ताधाऱ्यांना साथ देत आहेत. अगदी २०१८मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेने फ्रान्सला मागे टाकत सहाव्या स्थानी झेप घेतली आणि भाजपच्या नेत्यांनी, मोदींनीं आणि स्वतः तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारची पाठ थोपटून घेतली होती.

दरम्यान २०१४ नंतर पेड प्रसार माध्यमांचा सुळसुळाट वाढल्याने आणि काही ठराविक प्रसार माध्यमं सरकारचीच कामं करत असल्याने मोदी पंतप्रधान झाले आणि देशाची अर्थव्यवस्था झपाट्याने मोठं मोठ्या देशांना मागे टाकत असल्याचा कांगावा सुरु केला आहे आणि तो आजही सुरु असून २०२४च्या लोकसभा निवडणुका जाहीर होईपर्यंत असाच चिरंतर सुरु राहील अशी शक्यता आहे. कारण मोदी सरकार आणि त्यांच्या चुकीच्या धोरणांचं वास्तव जनतेसमोर मांडण्याचं धाडस आज प्रसार माध्यमं करताना दिसत नाही.

सध्या सर्वच प्रसार माध्यमांवर प्रसारित झालेली बातमी म्हणजे, चालू वर्षात भारत जगातील ५ वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे. सध्या भारत ६व्या स्थानावर असून ब्रिटन जगातील ५वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. त्यानुसार भारत ब्रिटनला मागे टाकणार असून ५व्या स्थानावर झेप घेईल. तसेच २०२५ सालापर्यंत आशिया पॅसिफिक क्षेत्रात जापानलाही मागे टाकत भारत दुसऱ्या स्थानावर जाईल, असे अनुमान ‘आयएचएस मार्किट’ने आपल्या अहवालात नमूद केले आहे.

मात्र प्रसार माध्यमं वाचकांपासून अत्यंत महत्वाची गोष्ट लपवत असून थेट मोदी सरकारची मदत करत असून, त्यांच्या चुकीच्या धोरणांवर पांघरून घालून अर्थव्यवस्था अजून धोक्यात घालत आहेत. होय! कारण भारतीय अर्थव्यवस्था २०११ मध्येच जगात ३ऱ्या क्रमांकावर होती व स्वतः जागतिक बँकेने तो अहवाल दिला होता. संबंधित विषयाला अनुसरून त्यावेळी अधिकृत बातम्या सर्वच प्रतिष्ठित प्रसार माध्यमांमध्ये झळकल्या होत्या. अर्थात त्याचा सबळ पुरावा देखील आम्ही देत आहोत. इतकंच नव्हे तर १९९६ ते १९९८ या कालावधीत भारतीय अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकावर होती. २०११ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था ३ऱ्या क्रमांकावर होती यासंबंधित बातम्यांचा तत्कालीन पुरावा आपण येथे क्लिक करून वाचू शकता (तत्कालीन बातमीसाठी येथे क्लिक करा). तर १९९६ ते १९९८ या कालावधीत भारतीय अर्थव्यवस्था जर्मनीला मागे टाकून ४थ्या क्रमांकावर होती याची तत्कालीन बातमी येथे वाचा (तत्कालीन बातमीसाठी येथे क्लिक करा). या संबंधित एक-दोन नव्हे तर अनेक बातम्या झळकल्या होत्या आणि त्याचे पुरावे आजही आहेत.

आता विषय हाच आहे की जर भारतीय अर्थव्यवस्था २०११ मध्येच तिसऱ्या क्रमांकावर होती, तर मोदी सरकारच्या सत्ताकाळात ती सध्या ६व्य क्रमांकावर का आहे असे प्रश्न मोदींना विचारण्याचे धाडस आजच्या प्रसार माध्यमांमध्ये अजिबात नाही. जर काँग्रेसच्या काळात अर्थव्यवस्था जगात ३ऱ्या क्रमांकावर होती, मग मोदींनी अशी नेमकी कोणती धोरणं राबवली कि आज भारतीय अर्थव्यवस्था जगात सहाव्या क्रमांकावर जाऊन पोहोचली आहे. अर्थात चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे असंच त्याचं उत्तर असेल. नोटबंदीमुळे देशाचा फायदा झाला आणि आमची आर्थिक धोरणं योग्य आहेत हे दाखविण्यासाठी थेट प्रसार माध्यमांना हाताशी धरून २०२४च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सध्या जोरदारपणे सुरु आहे. या संबंधित एक-दोन नव्हे तर अनेक बातम्या झळकल्या होत्या आणि त्याचे पुरावे आजही आहेत.

वास्तविक एखाद्या संस्थेने किंवा जागतिक संघटनेने जगातील सर्वच देशांचे एकूण आर्थिक फोरकास्ट सुनिश्चित केलेले असते आणि त्या ठरवलेल्या कार्यकाळानुसार प्रत्येक देशाची आर्थिक वाटचाल सुरु असते आणि त्याची आकडेवारी योग्य वेळेनुसार सार्वजनिक होत असते. त्याच सुनिश्चित करण्यात आलेल्या फोरकास्टनुसार सध्या भारताच्या अर्थव्यवस्थेची देखील बातमी संबंधित संस्थेने प्रसिद्ध केली आहे आणि ती सर्वच देशांच्या बाबतीत प्रसिद्ध केली जाते. मात्र भारतीय अर्थव्यवस्थेच्या २०११ मधील जगातील ३ऱ्या क्रमवारीचा सखोल विचार केल्यास आज भारत इंग्लंड आणि जपानच्या पुढे असला असता जो, २०१४ नंतर देशात आलेल्या मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे मागे गेला आहे. त्यामुळे प्रसार माध्यमांनी वाचकाच्या पुढे वास्तव मांडणं अत्यंत गरजेचे आहे आणि तेच होताना दिसत नाही.

त्यामुळे अर्थव्यवस्थेला बळकटी देऊन भारतीय अर्थव्यवस्था २०११ मध्येच जगात तिसऱ्या क्रमांकावर घेऊन जाणारे तत्कालीन आणि उच्च शिक्षित पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे आजच्या डिजिटल पिढीचे शिव्यांचे धनी झाले आहेत. कारण त्यांनी स्वतःच्या कर्तृत्त्वाचे मार्केटिंग केले नाही आणि प्रत्येक विषय जवाबदारीने हाताळून स्वतःला पब्लिसिटी पासून लांबच ठेवले. मात्र आजच्या मार्केटिंग’मध्ये माहीर असलेल्या मोदी सरकारने अर्थव्यवस्था डबघाईला आणली आणि अर्थव्यवस्थेचा जागतिक क्रमांक थेट ३ वरून ६ वर आणला खरा, परंतु वाचकाच्या आणि तरुणांच्या डोक्यात डॉ. मनमोहन सिंग यांच्याबद्दल समाज माध्यमांवरून इतकं विष पेरलं की ते देशाच्या अर्थव्यवस्थेचे व्हिलन ठरले आणि अर्थव्यवस्था डबघाईला घेऊन जाणारे मोदी सरकार हिरो ठरले आहेत. त्यामुळे खरंच आज बोलावं लागेल की ‘होय! माझा देश बदलतो आहे’.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x