4 August 2020 1:16 PM
अँप डाउनलोड

पवारांचा गौप्यस्फोट, म्हणजे तो पंकजा मुंडेंचा मास्टरस्ट्रोक नव्हता ?

सातारा : लातूर विधानपरिषदेच्या मतदार संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे भाजपमधून आलेले उमेदवार रमेश कराड यांनी अचानकपणे माघार घेतली आणि पंकजा मुंडेंचा मास्टरस्ट्रोक वगरे चर्चा रंगली आणि धनंजय मुंडेंना धक्का अशी राजकीय चर्चा झाली. परंतु स्वतः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी वस्तुस्थिती समोर आणून विरोधकांच्या दाव्यातील हवाच काढून टाकली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवारांनी हा गौप्यस्फोट केला. राष्ट्रवादीचे लातूर विधानपरिषदे उमेदवार रमेश कराड यांनी त्यांची आर्थिक ताकद नसल्यामुळे माघार घेतल्याचे त्यांनी सांगितले. परंतु या घटनेमुळे विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडेंना धक्काबिक्का काही नसल्याचे पवारांनी स्पष्ट केले.

रमेश कराड यांनी निवडणूक जाहीर झाल्यानंतर माझी आर्थिक ताकद नसल्याने मी निवडणूक लढू शकत नाही असे शरद पवारांनी सांगितले. तेच त्यांच्या माघार घेण्याचं कारण असल्याचं स्पष्टं केलं. रमेश कराड आयत्यावेळी घेतलेली माघार म्हणेजे धनंजय मुंडेंना धक्का वगैरे असं काही नाही, त्यामुळे असे निष्कर्ष काढणे म्हणेज धनंजय मुंडेंवर अन्याय ठरेल असं पवारांनी स्पष्ट केलं.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(283)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x