18 November 2019 12:20 AM
अँप डाउनलोड

भाजपकडून वंचित पक्ष फोडण्यास सुरुवात; गोपीचंद पडळकर भाजपात जाणार

Gopichand padalkar, Prakash Ambedkar, Vanchit Aghadi, Vanchit bahujan Aghadi

सांगली: गोपीचंद पडळकर यांनी भाजप प्रवेश करण्याचा निर्णय़ घेतला असून येत्या दोन दिवसांत ते भाजपमध्ये जाणार आहेत. प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या नावाबद्दल विविध तर्क लढविण्यात येतात. मात्र विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना पडळकर काय करणार याबद्दल उत्सुकता होती. तो निर्णय़ त्यांनी आता घेतला आहे. सांगली जिल्ह्यातील खानापूर मतदारसंघातून ते निवडणूक लढविणार आहेत.

धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा याआधीच सुरू होती, जेव्हा ते वंचित पक्षाच्या मेळाव्यांना गैरहजर राहायचे. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसू शकतो. पडळकर यांना सांगली जिल्ह्यातील जत किंवा खानापूर मतदारसंघात उमेदवारी मिळू शकते.

राज्यातील फायरब्रँड नेते म्हणून गोपीचंद पडळकर यांना ओळखले जाते. धनगर समाजाच्या आंदोलनाचे नेतृत्व त्यांनी केलं आहे. पडळकर हे भाजपमधील धनगर नेते म्हणून महत्त्वाच्या पदावर होते. मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी वंचितमध्ये प्रवेश केला होता. आता पडळकरही आंबेडकर यांच्यापासून दूर झाले. पश्चिम महाराष्ट्रात वंचितचे मेळावे झाले. त्यात ते सहभागी झाले नाहीत. ते पुढे काय करणार, याबाबत चर्चा झडू लागल्या. ते सांगोल्यातून उभे राहणार. गणपतराव देशमुख हे त्यासाठी जागा खाली करू देणार, असेही काहींनी सांगितले. प्रत्यक्षात तसे काही घडले नाही.

पडळकर हे वेगळा पक्ष कडून काॅंग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडीसोबत जातील, अशी चर्चा सुरू झाली. पडळकर शिवसेनेत जाऊन विधानपरिषद निवडणूक लढतील अशीही चर्चा सुरू झाली. कधी राष्ट्रवादीशी ते संधान साधू असल्याचे बोलले जाऊ लागले. मात्र आता त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.

हॅशटॅग्स

#Prakash Ambedkar(76)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या