24 April 2024 11:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 10 पेनी शेअर्स जे अवघ्या 1 रुपया ते 9 रुपयांमध्ये खरेदी करू शकता, संयमातून श्रीमंत होऊ शकता IREDA Share Price | IREDA शेअर्समध्ये गुंतवणूक फायद्याची ठरेल? तज्ज्ञांनी जाहीर केला सपोर्ट लेव्हल आणि रेझिस्टन्स लेव्हल Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत मोठी अपडेट आली, शेअर मोठ्या रॅलीसाठी सज्ज झाला, किती फायदा होईल? Bank Account Alert | महाराष्ट्रातील या बँकेत तुमचं खातं आहे? आता पैसे काढू शकणार नाही, RBI ने बंदी घातली IPO GMP | स्वस्त IPO शेअर आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागून मिळेल 113 टक्के परतावा, GMP चा धुमाकूळ Numerology Horoscope | 24 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 24 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

सातारा लोकसभा पोटनिवडणुक विधानसभेसोबत अचानक जाहीर झाल्याने चर्चा रंगली

Satara, Satara Loksabha By Poll Election, MP Udayanraje Bhosale, NCP, BJP

सातारा: देशातील अनेक ठिकाणी पोटनिवडणुका होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. परंतु सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची घोषणा मात्र केली नव्हती. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसोबतच ही पोटनिवडणूक होणार आहे. त्यामुळे या जागेसाठीही २१ ऑक्टोबरला मतदान होईल आणि २४ ऑक्टोबरला मतमोजणी होईल.

निवडणूक आयोगाने एक पत्रक काढून सातारा लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभा निवडणुकीसोबतचं होणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे उदयनराजेंना मोठा दिलासा मिळाला आहे. उदयन राजे यांनी जेव्हा भाजप प्रवेश केला तेव्हा विधानसभा निवडणुकीच्यावेळी लोकसभेची पोटनिवडणूक घेण्यात यावी अशी मागणी केली होती.

साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर साताऱ्यासह इतर भागातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले. ‘सर्वांचा विरोध असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंना तिकीट दिलं. जनतेनंही उदयनराजेंच्या बाजूने कौल दिला. मग त्यांनी आता अवघ्या तीन महिन्यात पक्ष का सोडला,’ असा प्रश्न राष्ट्रवादीकडून विचारला जात आहे.

मात्र मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचा कार्यक्रम शनिवारी जाहीर केला. त्यावेळी सातारा लोकसभा पोटनिवडणुकीबाबत भाष्य केलं नव्हतं. त्यामुळे पडद्यामागून काही हालचाली झाल्या का? याची चर्चा आता सुरु झाली आहे. मात्र २१ ऑक्टोबर ही पोटनिवडणूक होणार असल्याने साताऱ्याचा खासदार दिवाळीपूर्वी ठरणार हे निश्चित झालं आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x