12 December 2024 9:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

थकबाकीची रक्कम भरल्यास शेतकऱ्यांना ५० टक्के वीजबिल माफी मिळणार - राज्य सरकार

Chief Minister Uddhav Thackeray, Electricity bill

मुंबई, १९ नोव्हेंबर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ऊर्जा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कृषी विभागाशी संबंधित अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. नवीन कृषीपंप वीज जोडणीचे धोरण आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर करण्यात आले.

त्यामध्ये लघुदाब वाहिनी, उच्चदाब वाहिनी, सर्व्हिस कनेक्शन व सौर कृषीपंप याद्वारे वीज जोडणी देण्याचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले असून राज्यभर सुमारे एक लाख कृषीपंप वीज जोडण्या दरवर्षी देण्यात येणार आहेत. या योजनेअंतर्गत सर्व कृषी ग्राहकांना तीन वर्षांत टप्प्याटप्याने कायमस्वरूपी दिवसा ८ तास वीज पुरवठा करण्याचे नियोजन आहे. कृषी फिडर व वितरण रोहित्रावरील मिटर अद्ययावत करणे इत्यादी कामे करण्यात येणार आहेत. तसेच सद्य:स्थितीत कार्यरत असणाऱ्या कृषीपंपाना कॅपॅसिटर बसविण्यात येणार आहेत. यासाठी पायाभूत सुविधांच्या खर्चापोटी शासनामार्फत दरवर्षी १५०० कोटी रुपये याप्रमाणे २०२४ पर्यंत भागभांडवल स्वरूपात निधी महावितरण कंपनीस देण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

विशेष म्हणजे कृषी पंपाच्या वीजबिलाच्या थकबाकीची रक्कम भरली तर शेतकर्‍यांना ५० टक्के वीजबिल माफी मिळणार, असा निर्णय ठाकरेंच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आज पार पडली. त्यानंतर हे निर्णय जाहीर करण्यात आले आहेत.

ऊर्जा विभागातील शेती विषयक धोरणं मांडण्यात आली. आज शेतकऱ्यांना नवीन वीज कनेक्शनबाबत निर्णय घेण्यात आला. ग्रामीण भागात शेती पंपाची बिकट अवस्था आहे. आता ६६ टक्के निधी त्यासाठी वापरण्यात येईल. ४० हजार कोटींची थकबाकी होती, त्याबाबत निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांची मागील 5 वर्षांची थकबाकी होती, त्याचे डीले चार्जेस माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय ऊर्जा विभागाने घेतला आहे.

 

News English Summary: The cabinet meeting chaired by Chief Minister Uddhav Thackeray today took important decisions related to energy department, public works department and agriculture department. The policy of connecting new agricultural pumps was announced in the cabinet meeting held today. In particular, a decision has been taken in Thackeray’s cabinet meeting that farmers will get 50 per cent waiver of electricity bill if the arrears of electricity bill of agricultural pumps are paid. An important meeting of the state cabinet was held today. These decisions have since been announced.

News English Title: Chief Minister Uddhav Thackeray held meeting regarding electricity bill news updates.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x