गेंड्याचं कातडं पांघरलेल्या महाविकास आघाडी सरकारला जाग यायला तयार नाही

मुंबई, १७ नोव्हेंबर: राज्यातील तमाम ग्राहकांना भरमसाट वीज बिलावरून मोठा शॉक लागला आहे. कारण अनेक आंदोलनं होऊन देखील महाविकास आघाडी सरकारने सामान्य ग्राहकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत वीजबिल भरा असंच म्हटलं आहे. कारण ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनीच याबाबत माहिती दिली आहे.
लोकांनी वीज वापरली त्याचे बील भरावे कुठलीही वीजबिल माफी मिळणार नाही, असं ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केलं आहे आहेत. वाढीव वीज बिलातून सवलत देणे राज्य सरकारला परवडणारं नाही तसंच ते आर्थिंक दृष्ट्या अशक्य असल्याचं नितीन राऊत यांनी यापूर्वीच म्हटलं होतं. त्याचाच पुनरुच्चार राऊत यांनी पुन्हा केला.
दरम्यान, रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष व माजी मंत्री सदाभाऊ खोत (Rayat Kranti Sanghatana President and Former Minister Sadabhau Khot) यांनी राऊत यांच्यावर जोरदार शब्दांत प्रहार केला आहे.करोना संकटाच्या काळात शेतकरी आणि कामगारांचे कंबरडेच मोडले. गेले काही महिने अभूतपूर्व अशा आर्थिक संकटातून जात असलेल्या या वर्गाला १०० टक्के वीजबिलमाफी देऊन खरंतर आधार देण्याची गरज होती मात्र गेंड्याचं कातडं पांघरलेल्या राज्यातील महाविकास सरकारला जाग यायला तयार नाही, असे नमूद करत विरोधात असताना वीजबिल माफ करा, असे म्हणत शेतकरी व कामगारांबाबत कळवळा दाखवत होता मग आता सत्तेत आल्यावर काय झाले?, असा सवालच खोत यांनी केला.
महापूर आणि दुष्काळाच्या काळात तत्कालीन फडणवीस सरकारला विरोधकांनी धारेवर धरले होते. वीजबिलात सूट देण्यात यावी, शक्य झाल्यास वीजबिल माफ करण्यात यावे, अशी मागणी करत विरोधकांना टाहो फोडला होता. तेव्हा विरोधी बाकांवर असलेले आता सत्तेत आहेत आणि वापरलेल्या विजेचे बिल भरावेच लागेल, असे सांगू लागले आहेत. हे वागणे म्हणजे जनतेच्या मतांशी एकप्रकारची प्रतारणाच आहे, अशा शब्दांत खोत यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.
ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी प्रसार माध्यमांकडे दिलेलं स्पष्टीकरण नेमकं काय आहे.
वीज वापरली तितकेच बिल आले पाहिजे. कोणाचे वीज कनेक्शन कट होणार नाही. योग्य बिल नसले तर त्याची तक्रार करावी मीटर पाहणी केली जाईल. राज्यात बिल सवलत याबाबत प्रस्ताव केंद्र सरकारने मदत करावी अशी मागणी केली, पण केंद्र सरकारने मदत केली नाही. वीजबिल सवलत तूर्तास मिळेल असे वाटत नाही, असं नितीन राऊत म्हणाले. महावितरणने २४ तास वीज उपलब्ध केली. लोकांनी वीज वापरली त्याची बिलं भरावी. वीज कंपनीने लॉक डाऊनमध्ये वीज पुरवठा केला. महावितरणवर ६९ हजार कोटी कर्ज आहे. आम्ही कर्ज काढून कामकाज करत आहोत अजून किती करणार? असा सवाल नितीन राऊत यांनी विचारला आहे. दरम्यान, महावितरणने वीजबिल वसुलीबाबत परिपत्रक जारी केलं आहे. त्यानुसार डिसेंबर २०२० पर्यंत थकीत वीजबिले भरावी लागणार आहेत.
News English Summary: Sadabhau Khot, president of the Rayat Kranti Sanghatana and a former minister, has lashed out at Raut. This class, which has been going through an unprecedented financial crisis for the last few months, needed to be supported by 100 per cent electricity bill waiver, but the state government, which is covered in rhinoceros skin, is not ready to wake up, he said. What happened now that he came to power ?, Khot asked.
News English Title: Former minister Sadabhau Khot criticized MahaVikas Aghadi government news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Moschip Technologies Share Price | 10 रुपयाच्या पेनी शेअरने 3 वर्षात 481 टक्के मल्टीबॅगर परतावा दिला, आजही शेअर खरेदीला स्वस्त
-
Expleo Solutions Share Price | एक्स्प्लेओ सोल्युशन्स शेअर तेजीत, 3 वर्षांत गुंतवणूकदारांना 740 टक्के परतावा दिला, फायदा घेणार?
-
Budh Rashi Parivartan 2023 | बुध राशी परिवर्तन होतंय, 7 जूनपर्यंत या राशींना करिअरमध्ये मोठं यश आणि आर्थिक बळ मिळेल
-
HLE Glascoat Share Price | मालामाल शेअर! एचएलई ग्लासकोट शेअरने 4 वर्षात 1600% परतावा दिला, तर 10 वर्षात 10165% परतावा दिला
-
Inox Wind Share Price | आयनॉक्स विंड शेअरमध्ये तुफानी वाढ, मागील एका महिन्यात 30.18 टक्के परतावा दिला, तेजीचे कारण काय?
-
MM Forgings Share Price | मल्टिबॅगर शेअर! एमएम फोर्जिंग्ज शेअरने तब्बल 4900 टक्के परतावा दिला, प्लस डिव्हीडंड मिळणार
-
Carysil Share Price | मालामाल होण्याची मोठी संधी! 96503 टक्के परतावा देणारा कॅरीसिल शेअर अजून 40 टक्के परतावा देऊ शकतो
-
PCBL Share Price | पीसीबीएल शेअरने 77,000 रुपयाच्या गुंतवणुकीवर करोडोचा परतावा, आता अजून 31 टक्के परतावा देईल, डिटेल्स पहा
-
Tega Industries Share Price | टेगा इंडस्ट्रीज शेअरने 1 वर्षात 115% परतावा दिला, तर मागील 1 महिन्यात 31% परतावा दिला, डिटेल्स पहा
-
Brand Rahul Gandhi | दक्षिण भारतानंतर हिंदी पट्ट्यात सुद्धा ब्रँड राहुल गांधी! मध्य प्रदेशात सुद्धा काँग्रेस 150 जागा जिंकत बहुमताने सत्तेत येणार?