28 July 2021 6:13 PM
अँप डाउनलोड

अमृता फडणवीस यांच्या गाण्यावर डिसलाईक्सचा पाऊस | तरी म्हणाल्या मी पुन्हा येईन

Netizens dislikes, Amruta Fadnavis song, Tila Jagu Dya

मुंबई, १७ नोव्हेंबर: भाऊबीज ही बहीण आणि बावाच्या नात्यातील गोडवा वृद्धिंगत करणारा, नात्याची वीण घट्ट करणारा सण म्हणून साजरी केली जाते. या दिवसी बहीण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. या दिवसाचं औचित्य साधून विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सर्व भाऊरायांकडे एक मागणी केलीय.

BhagyaVivah Marathi Matrimonial

“तिला जगू द्या…” हे गाणं पोस्ट करत अमृता फडणवीस यांनी सर्व भाऊरायांकडे मागणी केली आहे. नेटकऱ्यांनी आपली नाराजी व्यक्त करत अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली. या टीकाकारांमध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता महेश टिळेकर देखील आहेत. “गायी म्हशीच्या हंबरण्याचा आवाज एकवेळ लोक सहन करतील पण हा आवाज सहन होत नाही”, असं म्हणत त्यांनी अमृत फडणवीस यांना खरंच गाता येतं का? सवाल केला आहे. दुसऱ्या बाजूला नेटिझन्सनी अमृता फडणवीस यांच्या एकूण गायकीवर डिसलाईक्सचा अक्षरशः पाऊस पाडला आहे.

दरम्यान अमृता फडणवीस यांनी या व्हिडीओला पुन्हा ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, ‘दोन दिवसांमध्ये दहा लाख व्ह्यूज मिळाल्याचे सांगत अमृता यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. “महिलांवर आधारित तिला जगू द्या या गाण्याला दिलेल्या प्रतिसादासाठी मी सर्वांचे आभार मानते. दोन दिवसांमध्ये या गाण्याला दहा लाख व्ह्यूज मिळाले. कौतुक आणि टीका दोघांचही मी स्वागत करते. तुमच्यासाठी नवीन काहीतरी घेऊन लवकरच मी पुन्हा येईन,” असं अमृता यांनी ट्विट केलं आहे.

वास्तविक समाज माध्यमांवरील व्हिडिओला मिळालेल्या एकूण व्ह्यूजचा आणि तो नेटिझन्सला आवडल्याचं काहीच संबंध नसतो हे अमृता फडणवीस यांना समजलं नसल्याचं दिसतंय किंवा त्यांना त्यांना त्याबद्दल माहिती नसावी. समाज माध्यमांवर अनेक व्हिडिओ असतात ज्यामध्ये घेण्यासारखं, शिकण्यासारखं किंवा पहाण्यासारखं काहीच नसतं तरी त्यांना करोडो व्ह्यूज मिळतात. मात्र विषय असतो तो लाईक्स किंवा डिसलाईक्सचा, ज्यानुसार लाईक्स करणाऱ्यांचं प्रमाण हजार देखील नसताना डिसलाईक्स मात्र ८ हजारांच्या वर गेल्या आहेत. त्यामुळे लोकांना गाण्याच्या विषयाबद्दल द्वेष नसून तर तो गायकी बद्दलचा असल्याचं एकूण प्रतिक्रियांवरून दिसतं.

 

News English Summary: Amrita Fadnavis retweeted this video. In it, he has said, ‘Amrita has thanked everyone saying that she got one million views in two days. “I thank everyone for their response to the song“ Let Her Live ”based on women. The song received one million views in two days. I welcome both appreciation and criticism. I will come back soon with something new for you, ”tweeted Amrita Fadnavis.

News English Title: Netizens dislikes Amruta Fadnavis song news updates.

हॅशटॅग्स

#Amruta Fadnavis(71)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x