14 December 2024 6:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Bollywood Actress Kajol | 'अशिक्षित राजकीय नेते भारतात राज्य करत आहेत' या काजोलच्या वक्तव्यावर देशभरात फक्त 'भक्तांना' का राग आला?

Bollywood Actress Kajol

Bollywood Actress Kajol | बॉलिवूडमधून बराच काळ ब्रेक घेतलेल्या अभिनेत्री काजोलने पुन्हा एका वेब सीरिजमधून पुनरागमन केलं आहे. काजोल आता ‘द ट्रायल’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. मात्र त्याआधीच काजोल चर्चेत आली आहे. काजोलने द ट्रायलच्या प्रमोशनदरम्यान केलेली टिप्पणीमुळे तिच्यावर टीका केली जात आहे. काजोलने नुकतेच देशातील अशिक्षित राजकारण्यांबद्दल भाष्य केले होते. सोशल मीडियावर तिचे विधान व्हायरल झाल्यानंतर केवळ भाजप समर्थक संतापल्याने नेटिझन्स देखील त्यांची फिरकी घेऊ लागले आहेत.

काजोलनं नेमकं काय म्हटलं?

काजोल म्हणाली, ‘भारतातील बदल संथ गतीने होत आहेत कारण लोक परंपरांमध्ये अडकलेले आहेत आणि योग्य शिक्षणाचा अभाव आहे. आपल्याकडे शिक्षण नसलेले राजकीय नेते आहेत. मला माफ करा, पण मी बाहेर जाऊन पुन्हा सांगेन. देशावर राजकारण्यांची सत्ता आहे. त्यांच्यामध्ये असे बरेच आहेत ज्यांना योग्य दृष्टीकोन देखील नाही, जे माझ्या मते शिक्षणाच्या अभावामुळे आहे,” असे काजोलनं म्हटलं आहे.

शिवसेना नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी प्रतिक्रिया दिली

या विधानावर या शिवसेना नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “काजोल म्हणते की आपल्यावर अशिक्षित आणि दूरदृष्टी नसलेल्या नेत्यांचे राज्य आहे. कोणीही रागावले नाही कारण त्याचे मत खरे असेलच असे नाही आणि त्यांनी कोणाचे नावही घेतले नाही. पण सर्व भक्त रागावले आहेत. कृपया तुमचे संपूर्ण राजकारणाचे ज्ञान घेऊ नका,” असे ट्वीट प्रियांका चतुर्वेदी यांनी केले आहे.

भाजप प्रेमी तुटून पडले

काजोलच्या मुलाखतीचा हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी तिला जोरदार ट्रोल करण्यास सुरुवात केली. ‘घराणेशाहीमुळे वर आलेली काजोल स्वत: शाळा सोडलेली निरक्षर आहे. तिचा पती कॅन्सर (गुटख्याची जाहिराती) विकतो आणि आता तिचा आत्मविश्वास बघा’, असं एकाने लिहिलं. तर ‘काजोलने शाळा सोडली होती आणि अजय देवगण गुटख्याची जाहिरात करतो. याच गोष्टींनी तिला अशी टिप्पणी करण्यापासून थांबवलं नाही’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय.

काजोल वर स्पष्टीकरण देण्याची वेळ

या सर्व वादावर अखेर काजोलने 8 जुलै रोजी तिच्या ट्विटरवर स्पष्टीकरण दिले आहे. “मी फक्त शिक्षण आणि त्याचे महत्त्व यावर बोलत होते. माझा उद्देश कोणत्याही राजकीय नेत्याला बदनाम करण्याचा नव्हता. आपल्याकडे काही महान नेते आहेत जे देशाला योग्य मार्गावर घेऊन जात आहेत,” असे काजोलनं म्हटलं आहे.

News Title : Bollywood Actress Kajol statement on Uneducated Politicians check details on 09 July 2023.

हॅशटॅग्स

#Bollywood Actress Kajol(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x