26 May 2022 7:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

वाघाला आता रोखणे किंवा गोंजारणे अशक्य : उद्धव ठाकरे

मुंबई : मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या भाजपच्या वर्धापनदिनी मित्रपक्ष शिवसेनेला गोंजारण्याचा प्रयत्नं भाजपच्या नेत्यांकडून झाला होता. तसेच मुंबईत झालेल्या भाजपाच्या मेळाव्यात अमित शहा यांनी युतीचे संकेत दिले होते. परंतु त्यालाच आता शिवसेनेकडून प्रतिउत्तर आलेलं आहे. शिवसेना पक्ष प्रमुखांनी त्याचाच संदर्भ घेत भाजपवर थेट टीकास्त्र सोडले आहे.

सामानातील अग्रलेखात उद्धव ठाकरे यांनी भूमिका त्यांची भूमिका मांडली आहे. मोदी लाट दिसताच तेलगू देसम पक्ष एनडीएमध्ये मध्ये शिरला आणि सध्या बाहेर पडला आहे. मात्र शिवसेना पक्ष म्हणजे पिंजऱ्यातला वाघ नाही, त्यामुळे वाघाला आता रोखणे किंवा गोंजारणे अशक्य असल्याची विधान करत उद्धव ठाकरे यांनी भाजपाला प्रतिउत्तर दिल आहे. केवळ निवडणुका आल्या की भाजपाला शिवसेनेची आठवण येते अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली आहे.

मुंबईतील भाजपच्या वर्धापनदिना निम्मित आयोजित मेळाव्यात भाजप अध्यक्ष काश्मीर हिंसाचार, दलित हिंसाचार आणि भ्रष्टाचार सारख्या महत्वाच्या विषयांवर बोलतील असे वाटेल होते. परंतु ती अपेक्षा पूर्ती फसली आहे. २०१४ मध्ये ज्याप्रमाणे साप, मुंगूस, कुत्रा आणि मांजरासारखे असणारे पक्ष एनडीएत आले होते. भाजपच्या वर्धापनदिनात भाजपचे राष्ट्रीय विचार सुद्धा वाहून गेल्याची टीका सुद्धा उद्धव ठाकरे यांनी सामना अग्रलेखातून केली आहे.

हॅशटॅग्स

#Shivsena(1153)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x