29 November 2022 10:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
LIC Mutual Fund | LIC शेअर्सने पैसे बुडवले, पण LIC म्युच्युअल फंडाच्या या योजना 100% पर्यंत परतावा देतं आहेत, लिस्ट सेव्ह करा Multibagger Stocks | पैसा कोणाला नको! हे 20 शेअर्स 530 टक्क्यांपर्यंत परतावा देतं आहेत, स्टॉक लिस्ट पहा, खरेदी करणार? Horoscope Today | 30 नोव्हेंबर 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Numerology Horoscope | 30 नोव्हेंबर, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल?, तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या Quick Money Share | काय सांगता! या टॉप 5 शेअर्सनी 5 दिवसात 53 पर्यंत परतावा दिला, शेअर्स नोट करा, पैसा वाढवा Gold Price Today | आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, खरेदीपूर्वी तुमच्या शहरातील लेटेस्ट दर तपासून घ्या SBI Recruitment 2022 | एसबीआय बँकेत (मुंबई) भरती, ऑनलाईन अर्ज करा
x

हिंसा नको, सरकार चर्चेला तयार: मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : मराठा समाजाने हिंसा वा आंदोलनाचा मार्ग न अवलंबता समाजाच्या मागण्यांबाबत महाराष्ट्र सरकारशी चर्चा करावी. मराठा समाजाशी चर्चा करण्यास आम्ही सदैव तयार आहोत, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी एका लेखी निवेदनाद्वारे प्रसिद्ध केले आहे.

तसेच मागील काही दिवसांपासून होणारी मराठा समाजाची आंदोलने, आत्महत्या व आत्महत्येचे प्रयत्नं या सर्व बाबी आमच्यासाठी अतिशय दु:खद आहेत, असे नमूद करताना काही राजकीय नेते परिस्थिती आणखी चिघळवून त्याचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यांनी महाराष्ट्राच्या हितार्थ व्यापक भूमिका घेऊन प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी या निवेदनाद्वारे केले आहे.

सकल मराठा समाजाच्या वतीने राज्यात काढण्यात आलेल्या शांततापूर्ण मोर्चांनंतर राज्य सरकारने त्याची दखल घेत विविध प्रकारचे निर्णय घेतले. विविध योजना किंवा इतर बाबींमध्ये कोणत्याही त्रुटी आढळून येत असतील, तर त्या चर्चेच्या माध्यमातून दूर करण्याची राज्य सरकारची तयारी आहे. तसेच राज्यातील मेगाभरतीच्या संदर्भात जो संभ्रम सकल मराठा समाजाच्या मनात निर्माण झाला आहे, त्याही बाबतीत चर्चा करून सर्वमान्य असा योग्य निर्णय घेणे शक्य आहे. त्यामुळे हिंसा किंवा आंदोलनाचा अवलंब न करता महाराष्ट्र शासनाशी चर्चा करावी, असे मुख्यमंत्र्यांनी या लेखी निवेदनात नमूद केले.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(708)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x