27 March 2023 9:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SIP Calculator | 1000 रुपयांच्या एसआयपीने 50 लाख मिळतील, एसआयपी कॅल्क्युलेटरने समजून घ्या फायदा New Tax Calculator | पगार वार्षिक 10 लाख रुपये, नवीन विरुद्ध जुनी टॅक्स व्यवस्था, किती टॅक्स भरावा लागेल पाहा PPF Calculator | जर PPF मध्ये दरमहा 10,000 रुपये गुंतवले तर मॅच्युरिटीला किती मोठी रक्कम मिळेल? गणना समजून घ्या ITR Filing 2023 | 1 एप्रिलपासून करदात्यांना ITR फाईल करता येणार, कोणते नवे फायदे मिळतील पहा SIP Calculator | स्वतःच 1 कोटींचं घर घ्यायचं असल्यास किती SIP करून शक्य होईल? फायद्याचं गणित समजून घ्या Viral Video | अर्रर्रर्र!! गायीला वाचवायला नाल्यात उतरला आणि पुढे काय झाल ते पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही   Raymond Share Price | रेमंड शेअर्स तेजीत येतं आहेत, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, स्टॉकची टार्गेट प्राईस पहा
x

Anil Deshmukh | माजी गृहमंत्री अनिल देशमुख अखेर जेलबाहेर, राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांसह कार्यकर्त्यांची फौज स्वागतासाठी

Anil Deshmukh

Anil Deshmukh | महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख यांची 14 महिन्यांनी जामिनावर सुटका झाली आहे. काहीच वेळापूर्वी अनिल देशमुख आर्थररोड जेलबाहेर आले आहेत. अनिल देशमुख यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे बडे नेते आणि कार्यकर्ते जेलबाहेर जमा झाले होते. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, सुप्रिया सुळे तसंच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अनिल देशमुख यांचं स्वागत केलं.

अनिल देशमुखांची प्रतिक्रिया :
‘मला खोट्या आरोपात फसविण्यात आलेलं आहे. परमबीर सिंह यांनी माझ्यावर 100 कोटींचा आरोप लावला. पण त्याच परमबीर सिंहने न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या कोर्टात जाऊन प्रतिज्ञापत्र दिलं की, मी जे अनिल देशमुखांवर आरोप केले 100 कोटींचे ते फक्त ऐकीव माहितीवर आहे. माझ्याकडेही त्याबद्दल काही पुरावा नाही.’

‘त्याच बरोबर हायकोर्टाच्या निर्णयामध्ये.. जे हायकोर्टाने निरीक्षण केलेलं आहे त्यामध्ये सुद्धा परमबीर सिंह यांच्या अतिशय जवळचा सचिन वाझे याने जे माझ्यावर आरोप केले होते त्याबद्दल हायकोर्टाच्या न्यायमूर्तींनी आपल्या जजमेंटमध्ये सांगितलं आहे की,सचिन वाझे याच्यावर अतिशय गंभीर स्वरुपाचे आरोप आहेत. अशा गंभीर स्वरुपाच्या आरोप असलेल्या आरोपीच्या साक्षीवर विश्वास ठेवता येणार नाही. आपल्याला कल्पना आहे की, सचिन वाझे याच्यावर आतापर्यंत दोन खुनाच्या गुन्ह्यात अटकेची कारवाई झाली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Former Home Minister Anil Deshmukh released from jail after high court order check details on 28 December 2022.

हॅशटॅग्स

#Anil Deshmukh(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x