28 March 2023 9:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Artemis Electricals Share Price | हा शेअर दहापट स्वस्तात मिळणार, रेकॉर्ड डेट जाहीर, फायद्यासाठी डिटेल्स पहा Quick Money Shares | 5 दिवसात गुंतवणूकदारांचे पैसे 97 टक्के पेक्षा जास्त वाढले, टॉप शेअर्सची लिस्ट सेव्ह करा, मजबूत फायदा SBI Credit Card | एसबीआय बँक क्रेडिट कार्डचे नियम बदलले, हे लक्षात ठेवा आणि फायद्यात राहा IRCTC Railway Ticket Discount | खुशखबर! वरिष्ठ नागरिक रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी, तिकीट मध्ये पुन्हा सूट मिळणार? Facial Cleansing | त्वचा टॅन होते आणि त्वचेवर धूळ बसते, पार्लरमध्ये न जाता 'या' स्टेप्सने घरीच तुमचा चेहरा करा स्वच्छ Max Cinema Hall | हा छोटा मिनी प्रोजेक्टर घरात चित्रपट गृह आणि क्रिकेट स्टेडियमचा आनंद देतोय, किंमत आणि फीचर्समुळे प्रचंड मागणी IRCTC Railway Ticket | रेल्वेने तिकीट बुकिंगचे नियम बदलले, प्रवासापूर्वी हे लक्षात ठेवा अन्यथा तुम्हाला सीट मिळणार नाही
x

मुख्यमंत्र्यांचा सांगली दौरा | मुख्यमंत्र्यांविरोधात बातम्या झळकण्यासाठी लोकांच्या आडून भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ?

CM Uddhav Thackeray

सांगली, ०२ ऑगस्ट | सांगली, कोल्हापूर, कोकण भागात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती ओढावली आहे. यामुळे नागरिकांचे बरेच नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगली जिल्ह्याचा दौरा करुन पूरस्थितीचा आढावा घेत आहेत. आज मुख्यमंत्री पूरबाधित गावांची पाहणी करत आहेत. यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोल्हापूर दौरा केला होता.

सकाळी अकरा वाजल्यापासून उद्धव ठाकरे अंकलखोप, भिलवडी, मौजे डिग्रज, कसबे डिग्रज आणि सांगली येथे पूर परिस्थितीची पाहणी करत आहेत. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, ‘ज्या क्षणी अतीवृष्टी होणार, संकट येणार हा एक अंदाज आला. तेव्हापासून प्रशासन कामाला लागले. शक्य होईल तिथल्या धोकादायक वस्त्यांमधील नागरिकांचे आपण स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. जवळपास 4 लाख नागरिकांचे स्थलांतर झाले आहे. जीवितहानी होऊ नये, हा आपला प्रधान्यक्रम होता.

दरम्यान, सध्या सामान्य लोकांच्या भेटीगाठींवर भर देणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यात भाजप कार्यकर्ते सामान्य लोकांमध्ये उपस्थित राहून राज्य सरकारविरोधात वातावरण कसं भडकेल याची व्यूहरचना आखली गेल्याचं दिसतंय. असे प्रकार अनेक ठिकाणी घडल्याने संशय बळावला आहे. याची कुणकुण शिवसेना नेत्यांनाही लागली आहे.

सांगलीच्या हरभट रोडवरील बाजारपेठेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्यापाऱ्यांच्या व्यथा जाणून घेत असतानाच मोठा गोंधळ झाला. मात्र गोंधळ घालणारे व्यापारी नव्हे तर स्थानिक भाजप कार्यकर्ते असल्याचं समोर आलं. माध्यमांमध्ये मुख्यमंत्र्यांविरोधात रोष असल्याची वृत्त पसरावी यासाठी हा उद्योग केला जातं असल्याचं म्हटलं जातंय. त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अचानक सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देत रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर तिथे जमलेल्या शिवसैनिकांनीही जोरदार घोषणाबाजी करत भाजपच्या कार्यकर्त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या ठिकाणी एकच गोंधळ उडाला. शेवटी पोलिसांनी धाव घेऊन दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना बाजूला सारण्याचा प्रयत्न केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगलीत आहेत. सांगलीच्या गावागावात जाऊन ते पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेत आहेत. त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहेत. दुपारी एकच्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीच्या हरभट रोडवरील बाजारपेठेत आले. यावेळी त्यांनी व्यापाऱ्यांचं म्हणणं ऐकून घेत त्यांचे निवेदनेही स्वीकारले. पण अचानक भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार गोंधळ घातला. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर बसले आणि जोरदार घोषणा देत ठिय्या आंदोलन सुरू केलं.

कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही:
पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ‘या संकटातून मार्ग काढणारच, किती नागरिकांना मदत करावी लागेल याची माहिती घेतली जात आहे. आपल्याला कायमस्वरुपी तोडगा काढावा लागणार आहे. काही ठिकाणी कटू निर्णय घ्यावे लागतील. मात्र कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, हे माझे वचन आहे. यासोतबच पण कटू निर्णयालाही तुम्हाला साथ द्यावी लागेल. नाहीतर 2005, 2019 2021 अशी पुरांची मालिका सुरुच राहील. दरवर्षी नुकसान आणि मदत हे चक्र भेदावे लागणार आहे. कायमस्वरुपी तोडगा काढावा लागणार आहे.’ असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पूरग्रस्तांशी संवाद साधताना म्हणाले आहेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: CM Uddhav Thackeray on Sangli flood affected area BJP interfere news updates.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x